शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

कोरोना वाढल्याने दीक्षांत समारंभाबाबत विद्यापीठाची द्विधावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 18:57 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत शासनाकडून काय मार्गदर्शक सूचना येतात, त्याकडे आमचे लक्ष आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेत एप्रिलअखेर दीक्षांत समारंभ घेण्याचा निर्णय झाला होता. प्रमुख पाहुण्यांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबाद : दीक्षांत समारंभाबाबत विद्यापीठ प्रशासन द्विधावस्थेत आहे. एप्रिल अखेरपर्यंत हा समारंभ घेण्याचा विचार होता. त्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रमुख पाहुण्यांची नावेही निश्चित झाली. काहींना त्यासंदर्भात उपस्थित राहाण्याविषयी कळविण्यातही आले आहे. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तो कधी आटोक्यात येईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत दीक्षांत समारंभ घेण्याचे मोठे आव्हान विद्यापीठासमोर आहे.

राज्यातील काही विद्यापीठांनी ऑनलाईन दीक्षांत समारंभ घेतले आहेत. मात्र, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जनजीवन सुरळीत झाले होते. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून औरंगाबादेत रोज हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन काय भूमिका घेते, त्यानुसार हा समारंभ ऑफलाईन घेता येईल की ऑनलाईन, यासंदर्भात पुढील निर्णय विद्यापीठ प्रशासन घेणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. एप्रिलअखेर हा समारंभ घेण्याचा मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक तथा पद्मविभूषण रघुनाथ माशाळकर, परम महासंगणकाचे जनक पद्मश्री डॉ. विजय भटकर किंवा के. कस्तुरीरंगन या तीन पाहुण्यांची नावे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी जे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, त्यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार परीक्षा विभागाने नुकतेच वैज्ञानिक रघुनाथ माशाळकर यांना या कार्यक्राला उपस्थित राहण्याबाबत पत्राद्वारे कल्पना दिली आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप संमती मिळालेली नाही. तथापि, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले विद्यापीठात रुजू झाल्यानंतर सप्टेंबर २०१९ व फेब्रुवारी २०२० मध्ये दीक्षांत समारंभ घेण्यात आले. त्यानंतर आता घेण्यात येणारा त्यांच्या कार्यकाळातील तिसरा समारंभ होईल.

सध्या शासनाच्या निर्णयाकडे लक्षकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत शासनाकडून काय मार्गदर्शक सूचना येतात, त्याकडे आमचे लक्ष आहे. व्यवस्थापन परिषदेत एप्रिलअखेर दीक्षांत समारंभ घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार प्रमुख पाहुण्यांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या पार्श्वभूमीवर तो कधी व कसा आयोजित केला जाईल, हे तूर्तास सांगता येणार नाही, असे प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या