शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाने मंजूर केलेल्या ६६ पैकी ५७ महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाने फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 12:50 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २३ फेब्रुवारीच्या बैठकीत निकषात बसणारे १५ प्रस्ताव सोडून उर्वरित २३८ कॉलेजचे प्रस्ताव फेटाळले होते.

ठळक मुद्देविद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय पाच महाविद्यालयांची सकारात्मक शिफारस

औरंगाबाद : राज्य शासनाने मंजूर केलेल्या नव्याने सुरू करण्यासाठीचे ६६ पैकी ५७ महाविद्यालयांचे प्रस्ताव सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेटाळण्यात आले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने ४, तर व्यवस्थापन परिषदेने १ अशा पाच महाविद्यालयांची सकारात्मक शिफारस केली आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २३ फेब्रुवारीच्या बैठकीत निकषात बसणारे १५ प्रस्ताव सोडून उर्वरित २३८ कॉलेजचे प्रस्ताव फेटाळले होते. मात्र, विद्यापीठाचा विरोध पत्करून १६ मार्चला राज्य सरकारने सर्व प्रस्ताव मागवून घेत सरकारने विद्यापीठ कार्यक्षेत्रात ६६ कॉलेज मंजूर केली होती. यात बहुतांश महाविद्यालये राजकीय पुढाऱ्यांची होती. त्यापैकी ५७ प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेने पुन्हा फेटाळले आहेत. केवळ ५ महाविद्यालयांची सकारात्मक शिफारस बैठकीत करण्यात आली. एका महाविद्यालयाने पुढील वर्षी सुरू करण्याची विनंती केली, तर ४ महाविद्यालयांनी प्रस्तावच दाखल केले नाही. व्यवस्थापन परिषदेने शिफारस केलेेल्या महाविद्यालयालाही यावर्षी केवळ कला व वाणिज्य शाळा, तर पुढील वर्षी विज्ञान शाखा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासह कंत्राटी कर्मचारी नियुक्ती, सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत किशोर शितोळे, डॉ. नरेंद्र काळे, राहुल म्हस्के, डॉ. फुलचंंद सलामपुरे, संजय निंबाळकर, डॉ. राजेश करपे, डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. जयसिंगराव देशमुख, सुनील निकम, प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाट, कुलसचिव तथा सदस्य सचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह सर्व सदस्यांची उपस्थिती होती.

प्रशासकीय इमारतीसमोर शिवाजी महाराजांचा पुतळाविद्यापीठात प्रशासकीय इमारतीसमोर सिटी बस स्थानक परिसरात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास मान्यता देण्यात आली .

पांडव यांच्या नियुक्तीवरून खडाजंगीविद्यापीठातील गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. रमेश पांडव यांच्या नियुक्तीवरून व्यवस्थापन परिषदेच्या बैठक सदस्यांची दीड तास खडाजंगी झाली. याप्रकरणी ठराव घेणे योग्य नसल्याचे म्हणत पुढील एका महिन्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन कुलगुरुंनी दिल्यावर सभेचे कामकाज सुरळीत झाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण