लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : डीपीच दुरुस्त करून मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकºयांतून मोठी ओरड वाढली आहे. यामुळे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी महावितरण कार्यालयात मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली असता अनेक रंजक बाबी समोर आल्या.अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांच्या कक्षात ही बैठक झाली. यावेळी कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी, उपअभियंता डी.ई. पिसे यांच्यासह डीपी दुरुस्त करणाºया कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेली माहिती रंजक आहे. डीपीत टाकण्यास २१0 ते ४0 लिटर आॅईल लागते. मात्र दिले जाते १७0 लिटर. शिवाय जळालेल्या डीपी बहुदा कोरड्याच येतात. कधी आॅईल आलेच तर त्यात पाणी टाकले जाते. तर आॅईलअभावी दुरुस्ती थांबते. त्यातच एक वर्षाचा गॅरंटी कालावधी असलेल्या डीपी अतिरिक्त भारामुळे दोन महिने टिकत नाहीत. त्यामुळे पुन्हा फुकट दुरुस्ती करून देण्याची वेळ या कंत्राटदारांवर येत आहे. त्यामुळे आता आॅईल चोरी न होण्यासाठी डीपीला वेल्डिंग करणे, गुन्हे दाखल करणे, संबंधित कर्मचारी, अधिकाºयांना जबाबदार धरून कारवाई करणे अशा बाबी आ.मुटकुळे यांनी सुचविल्या. त्या मान्य झाल्या. सध्या सुरू असलेल्या डीपींनाही वेल्डिंगसाठी एजन्सी नेमण्याचे ठरले आहे. तर वीजचोरी होत असल्यास थेट गुन्हे दाखल करा, असेही मुटकुळे म्हणाले. शिवाय फ्युज व किटकॅट नसल्यानेही असे प्रकार घडतात, असो मुटकुळे म्हणाले. तर त्यांनी सातच गावांत संपूर्ण अद्ययावत डीपी दाखवा, असे आव्हानच दिले. तेव्हा दुरुस्तीच्या निधी व साहित्यावरून अधिकाºयांतच मेळ नसल्याचे दिसून येत होते. तर नवीन जोडण्या व रोहित्रांसाठीही निधी नसल्याचे समोर आले.
आॅईलचोरीमुळे डीपींचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:54 IST