शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

औट्रम घाटातील बोगद्याच्या ‘डीपीआर’चे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 19:23 IST

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, चाळीसगावजवळ औट्रम घाटात ५ कि़मी. अंतराच्या टनेलचे काम हाती घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, चाळीसगावजवळ औट्रम घाटात ५ कि़मी. अंतराच्या टनेलचे काम हाती घेण्यात येणार आहे. व्हायाबिलिटी अहवालानंतर याचा कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मार्चपर्यंत याचा अहवाल येण्याची शक्यता असून, त्यानंतर याच्या कामाचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ चे काम गत काही वर्षांपासून सुरू आहे. बहुतांश ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले असून, काम प्रगतिपथावर आहे. चाळीसगाव परिसरात घाट असल्याने येथे ५ कि़मी. अंतराचा बोगदा तयार करण्याचे प्रस्तावित होते. या कामाला जवळपास ५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाची वस्तुनिष्ठता तपासण्याचे आदेश संबंधित अभियंत्यांना देण्यात आले. याचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदिल दाखवला. ‘एम्बर्ग’ या एजन्सीला औट्रम घाट टनेलच्या कामाचा डीपीआर तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. आगामी मार्चपर्यंत डीपीआरचे काम होईल. त्यानंतर  कामाचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल.

तीन पर्यायांवर विचार सुरूटनेलच्या कामाचे कंत्राट बीओटी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अथवा हायब्रीड अ‍ॅन्युटी पद्धतीवर दिले जावे, यावर डीपीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बारकाईने अभ्यास केला जात आहेऔट्रम घाटातील ५ कि़मी. अंतर असलेल्या या टनेलचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी अत्यंत बारकाईने याचा अभ्यास केला जात आहे. मार्चमध्ये डीपीआर तयार होईल त्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे या कामाचा प्रस्ताव पाठविला जाईल. - अजय गाडेकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभाग औरंगाबाद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग