शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्याने डीपीसी बैठक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 18:29 IST

नवीन पालकमंत्री म्हणून कुणाकडे जबाबदारी द्यावी, याचा निर्णय अजून झालेला नाही. परिणामी, माजी पालकमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली १४ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची नियोजित बैठक रद्द करण्यात आली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्याला चार वर्षांत तिसºयांदा पालकमंत्री नेमण्याची वेळ आली आहे. डॉ. दीपक सावंत यांनी ७ जानेवारी रोजी आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांचे पालकमंत्री पद गेले आहे. नवीन पालकमंत्री म्हणून कुणाकडे जबाबदारी द्यावी, याचा निर्णय अजून झालेला नाही. परिणामी, माजी पालकमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली १४ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची नियोजित बैठक रद्द करण्यात आली आहे.

सावंत यांनी कालावधी संपल्यामुळे राजीनामा दिल्याने नियोजन समितीची बैठक रद्द झाली आहे. पालकमंत्री नसल्यामुळे पीककर्ज, पीक विमा, खरीप हंगामाच्या अडचणी, दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे दुर्लक्ष होणार आहे.आता जिल्हा नियोजन समितीवर नव्याने अध्यक्ष तथा पालकमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत डीपीसीची बैठक होणे शक्य नाही. जानेवारीअखेर किंवा फेबु्रवारी महिन्यात झाली तर बैठक होऊ शकते. डॉ. दीपक सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ जुलै २०१८ च्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपला होता; परंतु सहा महिन्यांचा वाढीव कालावधी मिळाल्यामुळे त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत डीपीसीच्या दोन बैठका होणे शक्य होते. मात्र, या काळात एकच बैठक झाली. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेपूर्वी एकच बैठक होईल, तीदेखील नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली तर. डीपीसीची बैठक होईल अथवा न होईल; परंतु नेमून दिलेल्या कामांना प्रशासनाला आचारसंहितेपूर्वी वेगाने उरकावे लागणार आहेत. सध्या जिल्ह्याला पालकमंत्रीच नसल्यामुळे निधीच्या वाटपाबाबत चर्चा झाली असली तरी त्याला मंजुरी मिळालेली नाही.

१७ रोजी वार्षिक नियोजन बैठकजिल्हा वार्षिक योजना २०१९-२० चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात १७ जानेवारी रोजी राज्यस्तरीय बैठकीत निर्णय होईल. जिल्हाधिकाºयांना जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० चा प्रारूप आराखडा सादर करण्याबाबत नियोजन विभागाने ११ जानेवारी रोजी आदेश दिले आहेत. नियोजनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ जानेवारी रोजीच्या बैठकीकरिता संबंधित विभागप्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद