शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला नियम शिकवू नका, अन्यथा जेलमध्ये टाकू; उशिरा येणाऱ्या मुख्याध्यापिकेची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 10:28 IST

वेरुळ शिक्षकांचे शाळेत उशिरा येणे सुरुच; शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पांडे या औरंगाबादहून अप-डाऊन करत असल्याने त्या शाळेत नेहमी उशिरा येतात, असा पालकांचा आरोप आहे.

वेरूळ : जि.प. केंद्रीय प्रा. शाळेच्या मुख्याध्यापकांसह काही शिक्षक नेहमीच शाळेत उशिरा येतात. त्यामुळे शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२३) गांधीगिरी मार्गाने उशिरा आल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले होते. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.२४) किमान त्यांनी वेळेवर शाळेत येणे अपेक्षित होते. मात्र, त्या अर्धा तास उशिरा शाळेत दाखल झाल्या. याबाबत शालेय शिक्षण समितीने त्यांना जाब विचारल्यानंतर आम्हाला नियम शिकवू नका, आमच्यापरीने शाळा करू द्या, अन्यथा जेलमध्ये टाकू. अशी धमकी त्यांनी दिली. हे पाहून उपस्थित सर्वजण अवाक् झाले.

वेरुळच्या जि.प. शाळेत २८१ विद्यार्थी शिकत असून नऊ शिक्षक येथे कार्यरत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पांडे या औरंगाबादहून अप-डाऊन करत असल्याने त्या शाळेत नेहमी उशिरा येतात, असा पालकांचा आरोप आहे. मुख्याध्यापिकाच उशिरा येत असल्याने इतर शिक्षकही उशिरा येतात म्हणून शालेय समितीने बुधवारी मुख्याध्यापिका पांडे यांना उशिरा आल्याबद्दल गांधीगिरी मार्गाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दुसऱ्या दिवशी सर्व शिक्षक लवकर येतील असा सर्वांना अंदाज होता, मात्र मुख्याध्यापक स्वत: उशिरा शाळेत आल्या. इतर शिक्षकांपैकी चार शिक्षकही उशिरा आले. याबाबत शालेय समितीच्या सदस्यांसह पालकांनी त्यांना जाब विचारला. त्यावर त्या प्रचंड चिडल्या व ‘हे शासकीय कार्यालय असून तेथे आम्हाला तुम्ही नियम दाखवायचे नाही. आम्हाला आमच्या पद्धतीने शाळा करू द्या, अन्यथा जेलमध्ये टाकू’ अशी धमकी दिली. या गोंधळात सरपंचही तेथे हजर झाले. त्यामुळे संतप्त पालकांनी शिक्षकच शाळेत उशिरा येत असेल तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला कोण जबाबदार राहील, तसेच शाळेत पंधरा दिवसांपासून प्रार्थना, राष्ट्रगीत होत नाही, यावर सरपंच कुसुम मिसाळ यांनी मुख्याध्यापिका पांडे यांना चांगलेच सुनावले. त्यावर आज प्रशिक्षण असल्याने आम्ही उशिरा आलो आहे. यापुढे दररोज शाळेत वेळेच्या दहा मिनिटे अगोदर हजर राहत जाऊ, असे मुख्याध्यापिका पांडे यांनी सांगितले. यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, उपाध्यक्षा वर्षा घोडके यांच्यासह सदस्य, पालकांची उपस्थिती होती.

जि.प. शाळेत गोरगरिबांची मुले शिकतात. शाळेत वेळेवर येणे शिक्षकांना बंधनकारक आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कसा होईल, यावर मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी भर दिला पाहिजे. तसेच चुका होऊ नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे.- कुसूमताई मिसाळ, सरपंच, वेरुळ

गेल्या काही दिवसापासून वेरुळ येथील जि.प. केंद्रीय प्रा. शाळेतील शिक्षक आणि शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांचे वाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या वादावर लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल.- सचिन सोळंकी, गटशिक्षणाधिकारी, पं. स. खुलताबाद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzp schoolजिल्हा परिषद शाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र