शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

'राज ठाकरेंच्या भाषणावर बोलू नका', इम्तियाज जलील यांच्या MIM कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 14:03 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित करत मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे.

औरंगाबाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित करत मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे लागतील, त्याचबरोबर माझा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागलेले असतील. त्या मशिदी समोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावा असं काल राज ठाकरेंनी त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. पण असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षानं मात्र राज ठाकरेंच्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

"राज ठाकरेंच्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना मीच महाराष्ट्रातील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. सध्या आम्हाला त्यावर काही बोलायचं नाहीय", असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत. यामागचं कारण विचारलं असता त्यावर आम्ही वेळ आल्यावर बोलू आता काही बोलणार नाही, असा सूचक इशारा देखील जलील यांनी दिला. सध्या मात्र राज ठाकरेंच्या कोणत्याही वक्तव्यावर बोलायचं नाही अशी भूमिका जलील यांनी घेतली आहे. 

काय म्हणाले राज ठाकरे?राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे पक्षाच्या वार्षिक गुढीपाडवा मेळाव्याला काल संबोधित केलं. मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत सरकार काही निर्णय घेणार नसेल, तर मशिदींसमोर दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचा जप करू, असा इशारा राज ठाकरेंनी  दिला. मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील मशिदी आणि मदरसांची पोलिसांनी नीट तपासणी केल्यास त्यांना अनेक गोष्टी कळतील, असेही ते म्हणाले. तसंच ज्यापद्धतीनं ईडी, आयकर आणि सीबीआयच्या धाडी पडत आहेत. अशा धाडी मदरशांवर घाला अशी माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे, असं राज ठाकरे म्हणाले. पाकिस्तान आणि बांगलादेशातून अनेक मुस्लिम मुंबईत येऊन स्थायिक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलRaj Thackerayराज ठाकरेAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन