शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत नकोच; जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 12:12 IST

आर्थिक सक्षम ग्रामपंचायती स्वायत्त ठेवा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत गुरुवारी संमत करण्यात आला.

ठळक मुद्देआर्थिक सक्षम ग्रामपंचायती स्वायत्त ठेवामनपात समाविष्ट करून नागरिकांचे हाल करू नका.

औरंगाबाद : महापालिका हद्दीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून ते अनेक सुविधांची वाणवा आहे. त्यात वाळूज परिसरातील जोगेश्वरी, रांजणगाव, वडगाव, पंढरपूर या सक्षम व सुविधा पुरवणाऱ्या ग्रामपंचायतीचे क्षेत्र महापालिकेत समाविष्ट करण्यास जिल्हा परिषद सदस्यांनी विरोध दर्शविला. मनपात समाविष्ट करून नागरिकांचे हाल करू नका. आर्थिक सक्षम ग्रामपंचायती स्वायत्त ठेवा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत गुरुवारी संमत करण्यात आला.

अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सदस्य रमेश गायकवाड यांनी जोगेश्वरी, रांजणगाव, वडगाव, पंढरपूर या ग्रामपंचायतींची स्वायत्तता अबाधित ठेवण्याचा ठराव मांडला. तर ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना आगीतून फुफाट्यात टाकू नका म्हणत मधुकर वालतुरे यांंनी ठरावाला अनुमोदन दिले. मंजूर ठराव आणि सदस्यांसह गावकऱ्यांच्या भावना शासनाला कळविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

नियोजनावरुन सदस्यांची नाराजीजिल्हा परिषदेच्या निधी नियोजनाची माहिती स्थायी समितीसमोर ठेवायला हवी. नियोजनात सर्वांना समान न्याय द्या. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता येत नसेल तर निधी कोरोनाला देऊन टाका. अशी उद्विग्न अन् संतप्त भावना तायडे यांनी व्यक्त केली. मार्चअखेर आला तरी अद्याप नियोजन होत नसेल तर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. आधी ३३ टक्के नंतर ५९ टक्के, त्यानंतर १०० टक्के असे निकष बदलले. सुधारित मंजुरी मिळाली त्यानुसार नियोजन अंतिम टप्प्यात असून निधी परत जाऊ देणार नसल्याचे आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, शिवाजी पाथ्रीकर, किशोर पाटील, केशवराव तायडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष कवडे उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWalujवाळूज