शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना दाखल करणे नकोच, आपली ‘ओपीडी’च बरी बाबा; काही डाॅक्टरांनी बंद केली ‘आयपीडी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 12:14 IST

तर नवीन डाॅक्टर ‘आयपीडी’ सुरू करण्याचे धाडस करेनात

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली तर त्याला आंतररुग्ण विभागात (आयपीडी) दाखल करून आवश्यक ते उपचार द्यावे लागतात. पण, अनेक कारणांमुळे शहरातील काही डाॅक्टरांनी थेट ‘आयपीडी’ सेवा बंद करून केवळ ‘ओपीडी’च सुरू ठेवली आहे, तर नवीन डाॅक्टरही केवळ ‘ओपीडी’वरच भर देत असल्याने आरोग्य क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद शहर मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे. मल्टिस्पेशालिटी, सुपरस्पेशालिटी आणि काॅर्पोरेट रुग्णालयांचे जाळे वाढत आहे. नवीन रुग्णालय सुरू करताना डाॅक्टरांना गलेलठ्ठ पगाराची ऑफर, पॅकेज दिले जात आहे. खासगी रुग्णालयांची संख्या ५६० वर गेली आहे. या सगळ्यात ‘आयपीडी’ सेवा बंद करून केवळ ‘ओपीडी’त पूर्णवेळ देण्याकडे अनेक डाॅक्टरांचा कल दिसत आहे.

नियम सोपे हवेतरुग्णालयांना अनेक नियमांची पूर्तता करावी लागते. नियमांचा डाॅक्टरांना त्रास होता कामा नये. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन प्रयत्नशील आहे.- डाॅ. सचिन फडणीस, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

१२ फिजिशियनची आयपीडी बंदगेल्या वर्षभरात जवळपास १२ फिजिशियन डाॅक्टरांनी आयपीडी बंद केली. कोविड काळात झळ बसली. रुग्ण-डाॅक्टरांमध्ये वादाच्या घटना होतात. सोयीसुविधांचा खर्च आणि उत्पन्न यात तफावत अशा कारणांनी आयपीडी बंद केली जातेय.- डाॅ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन

ग्रुप प्रॅक्टिसवर भर :चार ते पाच डाॅक्टर एकत्र येऊन ग्रुप प्रॅक्टिस करण्यावर भर दिला जात आहे. ५ ते ६ ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञांनी आयपीडी बंद केली.- डाॅ. संध्या कोंडपल्ले, सचिव, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना

जुन्या रुग्णालयांना नियमात अडकवू नयेनवीन रुग्णालय सुरू होत असेल तर नियमांचे पालन करणे बंधनकारक असावे. परंतु जुन्या रुग्णालयांना नव्या नियमांची पूर्तता करणे अवघड होते. त्यामुळे जुन्या रुग्णालयांना नव्या नियमात अडकविता कामा नये. रुग्णांच्या नातेवाईकांचे आक्रमक वर्तन, विविध खर्चांमुळे ‘आयपीडी’ चालविणे अवघड होते. नव्या डाॅक्टरांनाही ‘आयपीडी’ सुरू करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ

‘आयपीडी’ बंद करण्याची कारणे :-वयोमानामुळे ‘आयपीडी’त वेळ देणे अशक्य.- ओपीडीतच रुग्णांची वाढती गर्दी.-‘आयपीडी’साठी सोयीसुविधांचा खर्च न परवडणारा.- रुग्णालय चालविताना नियमांची पूर्तता करण्यासाठी होणारा त्रास.-‘आयपीडी’त रुग्णांसोबत होणारे वाद.- काॅर्पोरेट रुग्णालयात रुग्णसेवा देण्यावर भर.

टॅग्स :doctorडॉक्टरAurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय