शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार महिलांमध्ये एक रुग्ण; घाटी रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रियेने 'तिचे' वैवाहिक जीवन सुकर

By बापू सोळुंके | Updated: June 2, 2023 15:27 IST

दुर्मिळ आजाराने विवाहिता होती त्रस्त, अखेर शासकीय रुग्णालयाने दिला दिलासा

छत्रपती संभाजीनगर: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) अतिविशेषोपचारमधील मुत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागातील डॉक्टरांनी केलेल्या अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया केल्याने  विवाहित रुग्णाच्या मातृत्वा चा मार्ग सुकर झाला आहे. या शस्त्रक्रियेमुळे महिलेस वैवाहिक सुख मिळू शकेल.

या शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना घाटी चे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड म्हणाले की, घाटी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात २५वर्षिय विवाहिता तिच्या आजाराविषयी सल्ला घेण्यासाठी आली होती.मुत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. व्यंकट गीते यांनी तिला तपासले तेव्हा  तिच्यामध्ये स्त्रियांमध्ये असलेली सर्व लक्षणे विकसित  झाली होती.  रेडिओलॉजी विभागात तिच्या पोटाची सोनोग्राफी , सिटीस्कॅन आणि  एमआरआय आदी तपासण्या डॉ. वर्षा रोटे आणि चमूने केल्या. यात  रुग्ण महिलेस जन्मजात  गर्भाशय ग्रीवा व योनीमार्ग नसल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. या आजाराला शास्त्रिय भाषेत 'एमआरकेएच सिंड्रोम' असे म्हणतात. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. पाच हजार स्त्रिमागे एखाद्या स्त्रीला असा आजार असतो.

या रुग्णाची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे आणि ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांनी रुग्णाचा पती,आई,वडिल आणि मामा यांना सांगून त्यांचे समुपदेशन केले. नातेवाईकांच्या संमतीनंतर रुग्णाच्या पोटातील मोठ्या आतड्याचा अंदाजे १० ते १५ सेंटीमीटरचा भाग त्याच्या रक्त पुरवठ्यासहीत वेगळा करून त्याचे योनीच्या जागी यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. या शस्त्रक्रियेने रुग्णाचे वैवाहिक आयुष्य चांगले होणार आहे. शस्त्रक्रियेस तीन तास लागले. या शस्त्रक्रियेमुळे महिला तंदुरूस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया डॉ. गीते यांनी आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरेश हरबडे, सहायक प्राध्यापक डॉ. बाबासाहेब ढाकणे यांंच्या सहकार्याने केली. भूलतज्ज्ञ डॉ.रश्मी बंगाली व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिवाय परिसेविका अर्चना वानखेडे, अधिपरिचारक गावेर्धन सिनारेची मदत झाल्याचे अधिष्ठातांनी सांगितले.

महाराष्ट्रात केवळ तीन ठिकाणीच अशा दुर्मिळ शस्त्रक्रिया अशा दुर्मिळ शस्त्रक्रियेस खाजगी रुग्णालयात सात ते आठ लाख रुपये खर्च येतो. महाराष्ट्रातील मुंबईतील जे.जे. रुग्णालय, वारणा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि  अन्य एका ठिकाणी अशी शस्त्रक्रिया होते.मात्र खाजगी रुग्णालयाचा खर्च रुग्णाला परवडणारा नव्हता.शिवाय मुंबईला जाण्याची त्यांची तयारी नव्हती. यामुळे मागील दहा वर्षापासून रुग्णाचा आजार माहिती होऊनही त्यांनी शस्त्र्रक्रिया केली नव्हती. घाटीतील यशस्वी शस्त्रक्रियेने नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आमच्यासाठी मोठे असल्याचे अधिष्ठाता म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीMedicalवैद्यकीयWomenमहिला