शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घाटीच्या ओपीडीत आता २ वाजेपर्यंत डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:45 IST

घाटी रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी आणि अपघात विभागातील गर्दी कमी करण्यासाठी बाह्यरुग्ण विभागात आता २ वाजेपर्यंत डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी आणि अपघात विभागातील गर्दी कमी करण्यासाठी बाह्यरुग्ण विभागात आता २ वाजेपर्यंत डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत.घाटीतील ओपीडीत सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत रुग्णांची आतापर्यंत नोंदणी करता येत होती. त्यानंतर येणारे रुग्ण थेट अपघात विभागात जात असत. त्यातून अपघात विभागात गंभीर रुग्णांबरोबर साधारण आजारांच्या रुग्णांचीही अधिक गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता ओपीडीत दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णांची नोंदणी करता येणार आहे, तर याठिकाणी २ वाजेपर्यंत डॉक्टर कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे १ वाजता नोंदणी झालेल्या रुग्णांची यापुढे २ वाजेपर्यंत तपासणी शक्य होणार आहे.याबरोबरच आता अपघात विभागाऐवजी ओपीडीतच रुग्ण भरती विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अपघात विभागातील गर्दीवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले, अपघात विभागातील गर्दी कमी करण्यासाठी हा बदल क रण्यात आला आहे.‘वर्ग घेण्यास सांगू नका’ओपीडीची वेळ वाढविण्यात आली आहे; परंतु यामुळे वैद्यकीय शिक्षणाऐवजी सर्व शक्ती रुग्णांच्या उपचारावर खर्च होत आहे. त्यामुळे वर्ग घेण्यास सांगू नका, असे काही डॉक्टरांनी घाटी प्रशासनाला म्हटले. त्यामुळे घाटी प्रशासनाची कोंडी झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य