शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही काम करा; आमचे सहकार्यच राहील; नवनियुक्त आयुक्तांना पदाधिकाऱ्यांचे आश्वासन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 11:22 IST

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बुधवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

ठळक मुद्दे नवनिर्वाचित आयुक्तांना पदाधिकाऱ्यांनी ‘तुम्ही काम करा, आमचे शंभर टक्केसहकार्य राहील’.असे आश्वासन देण्यात आले अनेक कामे रेंगाळली आहेत. या कामांना गती देण्याची सूचनाही करण्यात आली.

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बुधवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नवनिर्वाचित आयुक्तांना पदाधिकाऱ्यांनी ‘तुम्ही काम करा, आमचे शंभर टक्केसहकार्य राहील’. कोणताही निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घ्या. मागील काही दिवसांपासून अनेक कामे रेंगाळली आहेत. या कामांना गती देण्याची सूचनाही करण्यात आली.

मनपा आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. महापौरांनी तब्बल ५८ विकासकामांची यादीच डॉ. निपुण यांच्या हातात दिली. आयुक्तांनी प्राधान्याने सहा विषय घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. घनकचरा व्यवस्थापनात स्वत: ‘निपुण’असलेल्या आयुक्तांनी स्वच्छतेच्या कामासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असल्याचे नमूद केले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेते विकास जैन, स्थायी समितीचे माजी सभापती गजानन बारवाल, सेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी यांची उपस्थिती होती. 

आयुक्तांवर संपूर्ण विश्वासमनपा आयुक्तांनी सकाळी ८ वाजेपासून कामाला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची जिद्द, तळमळ लक्षात येते. शहरा कचराकोंडी, नालेसफाई, मालमत्तांचे  सर्वेक्षण, पाणी प्रश्न, आकृतिबंध आणि रिक्त जागा भरणे, स्मार्ट सिटी, समांतर योजना आदी विविध विषय प्राधान्याने सोडवावेत, अशी सूचना आयुक्तांना केली आहे. भूमिगत गटार योजना पूर्ण करणे, कचºयाचा केंद्रीय प्रकल्प उभारणे, स्मार्ट सिटीच्या कामांना गती देण्याबद्दलही चर्चा करण्यात आली आहे. यात आपण लक्ष घालून काम करण्याची इच्छा आयुक्तांनी व्यक्त केल्याचे घोडेले यांनी सांगितले. 

कॅलेंडर वर्ष पूर्ण करणार का?काही अपवाद वगळता महापालिकेत एकाही आयुक्ताने एक कॅलेंडर वर्ष पूर्ण केलेले नाही. कधी पदाधिकारी विरुद्ध आयुक्त असा सामना रंगतो. तर कधी आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्यात येतो. १२ महिने किंवा जास्तीत जास्त १४ महिने या पदावर अनेक आयुक्तांनी काम केले आहे. राज्य शासनाने खास निपुण विनायक यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे ते आपला कार्यकाळ कसा पूर्ण करतील याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद