शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

रोज ‘प्रभात फेरी’ करणाऱ्या महापौरांना खासदार व्हायचेय का ?; चंद्रकांत खैरे यांच्या महापौरांना कानपिचक्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:43 IST

महापौरांना आता खासदार, आमदार व्हायचे आहे काय? असा सवाल करीत खा. खैरे यांनी त्यांच्या जनसंपर्क मोहिमेवर तोंडसुख घेतले.

ठळक मुद्दे चंद्रकांत खैरे यांच्या महापौरांना कानपिचक्या शहरातील विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका 

औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांनी दररोज सकाळी जनतेच्या दारी जाऊन भेटी-गाठीचे सुरू केलेले सत्र अखेर मंगळवारी खा. चंद्रकांत खैरे यांच्या डोळ्यांत आले. महापौरांना आता खासदार, आमदार व्हायचे आहे काय? असा सवाल करीत खा. खैरे यांनी त्यांच्या जनसंपर्क मोहिमेवर तोंडसुख घेतले. शहरातील विकासकामे रखडली आहेत, त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे खासदारांनी महापौरांवर पत्रकारांशी बोलताना टीकास्त्र सोडले.  

दिशा समिती, रस्ते सुरक्षा समिती आणि ग्रामीण विकासाशी निगडित समित्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान आवास योजनेत ग्रामीण भागांत सुरू असलेल्या कामाच्या तुलनेत महापालिकेच्या हद्दीत गती मिळत नसल्यामुळे खा. खैरे यांनी महापौर घोडेले यांना ग्रामीणविकासच्या बैठकीत विकासकामांकडे लक्ष द्या, असे बोलून चिमटा काढला. महापौर घोडेले हे गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन  कार्यक्रमात बराच वेळ अडकले. त्यामुळेही खा. खैरे संतापले. या मोहिमेला सुरुवात केल्यानंतर महापौरांनी तिथे अडकून राहण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर रखडलेल्या मनपांतर्गत असलेल्या सगळ्याच कामांचा धांडोळा खा. खैरे यांनी घेतला.

मध्य मतदारसंघातून हवी उमेदवारीपत्रकारांनी खा. खैरे यांना प्रश्न केला की, महापौर घोडेले यांना मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यावर खा. खैरे म्हणाले, ते मी ठरवील ना, माझ्या हातात आहे, त्यांना कुठून उभे करायचे आहे ते. काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना भूमिगत गटार योजना, समांतर जलवाहिनी योजनांसाठी निधी मिळविला. त्या योजना पूर्ण करण्याकडे महापौरांनी लक्ष दिले पाहिजे. 

२७ जानेवारीपासून आचारसंहिता२७ जानेवारी २०१९ पासून लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. आजपासून दोन महिन्यांचा कार्यकाळ राहिला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मनपा हद्दीत दिलेल्या योजनांची कामे गतीने करून घेतली पाहिजेत. आचारसंहितेत प्रशासनातील अधिकारी पदाधिकाऱ्यांना मोजतदेखील नाहीत. पंतप्रधान आवास योजनेसह शहरातील  समांतर जलवाहिनी योजना, भूमिगत गटार योजना, रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्यांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे खैरे म्हणाले.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद