शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

विद्यार्थ्यांनो अभ्यास करताय ना ? विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 12:35 IST

प्रथम वर्ष सोडून विद्यापीठाच्या उर्वरित वर्गाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ मार्चपासून होणार आहेत.

ठळक मुद्दे१६ मार्चपासून परीक्षाशनिवार, रविवारी पेपरला सुटी१४ मार्चपर्यंत 'मॉक टेस्ट'

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा (द्वितीय व तृतीय वर्षाच्या ) नियोजित वेळापत्रकानुसार १६ मार्चपासूनच सुरू होणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून परीक्षा घ्याव्यात, असे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी बुधवारी दिले.

औरंगाबाद शहर व जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिल या काळात जिल्हा प्रशासनाने अंशतः लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासन यांनी यासंदर्भात घ्यावयाची काळजी व सर्व सूचना काटेकोरपणे पाळण्याचे आदेश विद्यापीठाने संबंधित सर्व केंद्र व महाविद्यालयातील दिले आहेत. प्रथम वर्ष सोडून विद्यापीठाच्या उर्वरित वर्गाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ मार्चपासून होणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्याचा तसेच एखादा विद्यार्थी आजारी आढळल्यास त्याची वेगळी बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

ऑफलाईनसाठी होम सेंटरया काळात औरंगाबादसह चारही जिल्ह्यांतील परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. तथापि, या काळातील सर्व शनिवार-रविवारी विद्यापीठ परीक्षाचे पेपर ठेवण्यात आलेले नाहीत. यासंदर्भातील परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १४ मार्चदरम्यान ऑनलाईन मॉक टेस्ट देता येणार आहे. ऑनलाईन पर्याय निवडलेल्यांना ही टेस्ट देणे गरजेचे आहे. ऑफलाईन विद्यार्थ्यांना स्वत:चे महाविद्यालय हेच ‘होम सेंटर‘ असणार आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षेसोबतच १ एप्रिलपासून होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद