जालना: गेल्या वर्षीचा कृत्रिम पावसासंदर्भातला अनुभव वाईट आहे. त्यामुळे यावर्षी कृत्रिम पाऊस पाडण्या संदर्भात राज्य सरकारने कोणताही विचार केलेला नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संपूर्ण राज्यात पाऊस लांबल्यामुळेच खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. तसेच सर्वदूर चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीत सरकारने पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाई संदर्भात सर्वोतोपरी उपाययोजना अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून, सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यांची चिंतनीय स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवरच त्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या पाण्याचा अत्यंत काटेकोरपणे वापर करण्याच्या सूचना बजावल्या आहेत. तसेच पाणीपुरवठा योजनांचेही स्त्रोत तपासावेत, त्यातून पुढील नियोजन करावेत, असे आदेश दिले गेल्या आहेत. जायकवाडीतील उपयुक्त व मृत साठ्यातून पिण्याएवढे पाणी पुरेल असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री पवार यांनी या टंचाईस सदृश्य स्थितीत सर्वतोपरी जलदगतीने निर्णय घेतले जातील याची ग्वाही दिली. यावेळी जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती संदर्भात जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ग्रामीण भागात आवश्यक त्या ठिकाणी टँकरने तसेच विहिरी अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी आ.चंद्रकांत दानवे, जिल्हाधिकारी एस.आर.रंगानायक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)संशयास्पद आगीची चौकशी होणार महावितरण कंपनीच्या पोलिस ठाण्यातील संशयास्पद आगीची प्रकरणाची राज्य सरकारद्वारे चौकशीद्वारे केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालन्यात पत्रकरांशी बोलताना दिली.सहा जिल्ह्यांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे असणाऱ्या या कार्यालयातील कपाटास आग लागावी, त्यात महत्वपूर्ण दस्तऐवज भस्म व्हावेत, विशेषत: केवळ एफआयआरची कागदपत्रे नष्ट व्हावीत हे सकृतदर्शनी संशयास्पद वाटत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच या संशयाबाबत खातरजमा व्हावी म्हणून राज्य सरकारने स्वतंत्रपणे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पवार यांनी म्हटले.
कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार नाही- पवार
By admin | Updated: July 15, 2014 00:56 IST