शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे पाणी आमच्या शेतात सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:09 IST

औरंगाबाद : सोलापूर औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भालगाव येथे रस्त्याच्या डाव्या बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी विरुद्ध ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : भूसंपादनानंतर उर्वरित जमिनीतील माती वाहून जाणार

औरंगाबाद : सोलापूर औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भालगाव येथे रस्त्याच्या डाव्या बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी विरुद्ध दिशेला शेतकऱ्यांच्या शेतात सोडण्यात येत आहे. या प्रक्रियेला शेतकºयांनी मंगळवारी कडाडून विरोध दर्शविला. अगोदरच आमच्या जमिनी घेऊन राष्टÑीय महामार्ग करण्यात येत आहे. उर्वरित जमिनीत पाणी सोडल्यास संपूर्ण माती वाहून जाईल, राष्टÑीय महामार्ग अधिकाºयांनी यात मार्ग काढावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अब्दुल वाहब अब्दुल बारी कुरैशी, रफिया बेगम यांनी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, भालगाव येथील गट नं. ३५० मधील ११०० चौरस मीटर क्षेत्र राष्टÑीय महामार्गासाठी २०१६ मध्ये घेण्यात आले. या जागेचा अर्धाच मोबदला मिळाला आहे. उर्वरित मोबदल्यासाठी आजही जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे या भागातील शेतकºयांना झिजवावे लागत आहेत. त्यातच रस्त्याचे काम करणाºया अधिकारी व कंत्राटदारांनी विरुद्ध बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी आमच्या शेतासमोर आणून सोडण्याचा निर्णय घेतला. मोठ-मोठे पाईप टाकून काम सुरू केले. सुरुवातीला शेतासमोर मोठी सिमेंटची नाली बांधून पाणी वाहून नेण्यात येईल, असे शेतकºयांना सांगितले. आता थेट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतात ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यावर पाणी सोडल्यास संपूर्ण माती वाहून जाईल. या कामामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे काम करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी