शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा वेतन देयकात समावेश करू नका, अधीक्षकांच्या आदेशाने खळबळ

By राम शिनगारे | Updated: October 11, 2023 19:40 IST

जिल्ह्यात १५४ शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक, सैनिकी शाळा, अध्यापक विद्यालयातील शिक्षकांची २०२२-२३ च्या संचमान्यतेत मंजूर पदांचेच वेतन ऑक्टोंबर २०२३ च्या वेतन देयकात समाविष्ट करावेत, कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन आहरित करू नये, असे आदेश माध्यमिकचे वेतन अधीक्षक मधुकर आव्हाड यांनी मुख्याध्यापकांना मंगळवारी (दि.१०) दिले. त्यामुळे जिल्ह्यात १५४ शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यभरात ३० सप्टेंबरपर्यंत २०२२-२३ च्या संचमान्यता देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आधारचे प्रमाणिकरण अंतिम मानण्यात आले. त्यानुसार शाळांना संचमान्यता मिळाल्या आहेत. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या आधारे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे अनेक शाळांमधील एक किंवा दोन विद्यार्थी कमी पडल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानित शाळांमधील तब्बल १५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. या शिक्षकांच्या ऑक्टोंबर महिन्यातील पगार वेतन देयकात समाविष्ट करण्यात येऊ नये, असे वेतन अधिक्षकांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार मुख्याध्यापकांना आदेश दिले. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शिक्षकांनी आमचे समायोजन होईपर्यंत वेतन थांबविण्यात येऊ नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

वेतन थांबविण्यात येऊ नयेराष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, प्राथमिकचे एम.एम. खुटे, कार्याध्यक्ष वाहेद शेख, उपाध्यक्ष विलास उमाप, आरेफ शेख यांनी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची भेट घेत अतिरिक्त शिक्षकांचे वेतन थांबवू नये, अशी मागणी निवेदनद्वारे केली. तेव्हा उपसंचालक साबळे यांनी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची स्वतंत्र यादी संबंधित शाळांनी दिल्यास शिक्षकांचे वेतन करण्यात येईल, असे सांगितले.

 

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबाद