शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा पाणीपुरवठा खंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:57 IST

जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. मागील पाच वर्षांपासून मनपाने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीच भरली नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गुरुवार, २७ डिसेंबरपासून हळूहळू पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा मागील आठवड्यातच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.

ठळक मुद्देमनपाची विनंती : जलसंपदा विभागाला पत्र

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. मागील पाच वर्षांपासून मनपाने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीच भरली नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गुरुवार, २७ डिसेंबरपासून हळूहळू पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा मागील आठवड्यातच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. कारवाई टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने जलसंपदा विभागाला थकबाकी भरण्याची कारवाई सुरू असल्याचे कळविले आहे. या पत्रावर जलसंपदा विभागाचे समाधान न झाल्यास गुरुवारी दोन तास पाणी उपसा थांबविण्यात येईल.जायकवाडी धरणातून दररोज १५० एमएलडी पाणी मनपा घेत आहे. मनपाने जेवढे पाणी घेतले, तेवढ्या पाण्याची पाणीपट्टीही पाटबंधारे विभागाला भरणे आवश्यक आहे. महिन्याला सुमारे १८ ते २० लाख रुपये पाणीपट्टी आकारण्यात येते. दरमहा ही रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरणे अभिप्रेत आहे; मात्र मागील ५ वर्षांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंबंधीची संचिका लेखा विभागाकडे पाठविली आहे. अद्यापही लेखा विभागाकडून ही रक्कम अदा केली नाही. पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून तब्बल १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले. शेवटी पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर २०१८ पर्यंत १० कोटी ६८ लाख ६० हजार रुपये पाणीपट्टीपोटी भरावेत, अशी नोटीस १३ डिसेंबर रोजी मनपाला बजावली आहे. पाणीपट्टी तात्काळ अदा न केल्यास २७ डिसेंबरपासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली जाईल. ३१ डिसेंबरला पूर्ण पाणी उपसाच बंद करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. पाण्याचा उपसा बंद केल्यानंतर शहरवासीयांची जी गैरसोय होणार आहे, त्यास पूर्णत: पालिका जबाबदार राहील, असेही कळविण्यात आले आहे.समांतरच्या कंपनीची थकबाकीजलसंपदा खात्याने मनपाला पाणीपट्टी शुल्काची नोटीस बजावली आहे; परंतु यातील ६ कोटी रुपयांची थकबाकी ही समांतरच्या ठेकेदार कंपनीच्या काळातील आहे. मनपाने १ सप्टेंबर २०१४ पासून शहराची पाणीपुरवठा योजना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविलेली होती. पुढे दोन वर्षे म्हणजे १ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हे काम कंपनीकडे होते. या काळात कंपनीने जलसंपदाकडे पाणीपट्टीचे शुल्क भरलेच नाही, त्यामुळे आता मनपाकडील थकबाकीची रक्कम अधिक दिसत असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी नमूद केले.पाणी कपातीचा कार्यक्रम२७ डिसेंबर- जायकवाडीत पाण्याचा उपसा दोन तास बंद केला जाईल.२८ डिसेंबर- चार तासांसाठी उपसा बंद केला जाणार आहे.२९ डिसेंबर - सहा तास उपसा बंद राहील.३० डिसेंबर- आठ तास पाण्याचा उपसा बंद राहील.३१ डिसेंबर -पाणी उपसा पूर्णत: बंद केला जाईल.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक