शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धर्माची मानहानी होईल असे वर्तन करू नये; चंद्रकांत खैरेंचा शांतिगिरी महाराजांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 15:42 IST

शांतिगिरी महाराजांना आपण या आधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्म मानहानी होईल असे वर्तन करू नये असा सल्ला खासदार चंद्रकांत खैरे यांनी शांतिगिरी महाराजांना दिला. ते लोकमत प्रतिनिधीशी शांतिगिरी महाराजांच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीबद्दल बोलत होते.

औरंगाबाद : शांतिगिरी महाराजांना आपण या आधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्म मानहानी होईल असे वर्तन करू नये असा सल्ला खासदार चंद्रकांत खैरे यांनी शांतिगिरी महाराजांना दिला. ते लोकमत प्रतिनिधीशी शांतिगिरी महाराजांच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीबद्दल बोलत होते.

गेल्या महिन्यात शांतीगिरी महाराजांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन स्नेहभोजन घेतले होते. त्यानंतर जाहीरपणे पहिल्यांदाच रविवारी ते एनजीओच्या मेळाव्यात  मार्गदर्शनासाठी आले होते. यावेळी बोलतांना त्यांनी औरंगाबादमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याचे सूचक वक्तव्य केले होते. याबाबत खासदार खैरे यांची प्रतिक्रिया लोकमत प्रतिनिधीने जाणून घेतली. 

यावेळी खा. खैरे म्हणाले, शांतिगिरी महाराजांना आपण या आधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्म मानहानी होईल असे वर्तन करू नये. तसेच काल झालेला एनजीओचा मेळावा हे शासकीय व्यासपीठ असेल तर तेथे महाराजांना का बोलावले. त्यांची कोणती एनजीओ आहे. याबाबत विभागीय आयुक्तांना जाब विचारू असेही खा. खैरे म्हणाले.

भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी दोन इच्छुक दरम्यान काल चिकलठाण्यातील कलाग्राम येथे अनुलोम संस्था, सीआयआय, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाजमंडळातर्फे एनजीओ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या व्यासपीठावर शांतीगिरी महाराज आणि विभागीय आयुक्त डॉ. भापकर या दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या उभयतांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले शांतीगिरी महाराज आणि डॉ. भापकर हे दोघेही एकाच व्यासपीठावर राज्यात सरकारच्या योजना प्रचार-प्रसार करण्याचे काम करणार्‍या संस्थेबरोबर आल्यामुळे दोघांपैकी एक भाजपचा उमेदवार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद