शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

बाजारात दिवाळी; १७ दिवसांत दीड हजार कोटींची उलाढाल अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 13:13 IST

यंदा दसरा सण शेवटच्या आठवड्यात आला. तरीपण बाजारात ५०० कोटींची उलाढाल झाली.

ठळक मुद्देशहरवासियांची आता तयारी ‘लक्ष्मीपूजना’चीपगार व बोनस एकदाच मिळणार असल्याने बाजारात खरेदीला उधाण येणार आहे.

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद :  कंपन्या कामगारांना बोनस जाहीर करीत आहेत. यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात कोरोनामुळे खबरदारी घेत सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी ग्राहकांनी ऐनवेळी खरेदी करणे टाळत आतापासूनच कपड्यासह अन्य खरेदीला सुरुवात केली आहे. आगामी १७,  दिवसांत बाजारपेठेत दीड हजार कोटींची उलाढाल होईल, अशी शक्यता जिल्हा व्यापारी महासंघाने व्यक्त केली आहे. 

यंदा दसरा सण शेवटच्या आठवड्यात आला. तरीपण बाजारात ५०० कोटींची उलाढाल झाली. आता पुढील महिन्यात दिवाळी १४ नोव्हेंबर रोजी (लक्ष्मीपूजन) साजरी करण्यात येणार आहे. पगार व बोनस एकदाच मिळणार असल्याने बाजारात खरेदीला उधाण येणार आहे. यंदा गर्दी टाळण्यासाठी ग्राहक दसऱ्यापासूनच दिवाळी खरेदीला लागले आहेत. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, पुढील १७ दिवसांत शहरात सर्व बाजारपेठ मिळून  दीड हजार कोटींची उलाढाल होईल. या अंदाजाने सर्व व्यापाऱ्यांनी तयारी केली आहे. 

अजय तलरेजा यांनी सांगितले की,  सध्या लहान मुलांचे ड्रेस, तरुणींचे ड्रेस व महिला साड्या खरेदीसाठी कापड बाजारात येत आहेत.  दिवाळीपर्यंत कापड बाजारात २०० कोटी रुपयांची उलढाल अपेक्षित आहे. किराणा जनरल मर्चंट असोसिएशनचे संजय कांकरिया यांनी सांगितले की,  जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात आहेत. किराणा व्यवसायात जवळपास ७० कोटींची उलाढाल होईल. याशिवाय इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक्स बाजार, मोबाईल, लॅपटॉप, सोने, फर्निचर,  रंग, आदी व्यवसायांतही चांगली उलाढाल होण्याची चिन्हे आहेत. 

बहुतांश कंपन्या ५ तारखेपर्यंत देणार बोनसबजाज ऑटो कंपनीने बोनस जाहीर केला. बहुतांश  कंपन्यांनी येत्या ५ नोहेंबरपर्यंत बोनस जाहीर करण्याची तयारी केल्याची  माहिती औद्योगिक वर्तुळातून मिळाली. औरंगाबाद वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा या औद्योगिक वसाहतीत ४ हजारच्या जवळपास कंपन्या आहेत. त्यात दीड लाखापेक्षा अधिक कामगार काम करतात. बजाज कंपनी प्रत्येकी २५ हजारांनुसार ५ हजार कामगारांना बोनस वाटप करणार आहे.  उर्वरित बहुतांश कंपन्यांचा बोनसही ५ ते १० तारखेपर्यंत कामगारांच्या हाती येईल. यामुळे शहरात मोठी उलाढाल होणार आहे.

मागील बोनसचे १०० कोटी गेल्या वर्षी जिल्ह्यातील विविध कंपन्या मिळून १०० कोटींहून अधिक रुपयांचे बोनस कामगारांना वाटप केले होते. यंदाही किमान तेवढेच बोनस दिले जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात हा पैसा कामगाराच्या हातात पडू शकेल. - मुकुंद कुलकर्णी, मराठवाडा अध्यक्ष, सीआयआय

६ हजार वाहने विक्रीचे उद्दिष्टवाहन बाजारात सर्व वितरक मिळून  येत्या १७ दिवसांत १ हजार चारचाकी वाहने व ५ हजार दुचाकी विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात १५० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. - राहुल पगारिया, अध्यक्ष, चेंबर ऑफ ऑथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजारDiwaliदिवाळी 2022MONEYपैसा