शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सहमतीने घेतला घटस्फोट; आता पत्नी व मेव्हणीची करतोय सोशल मीडियावरून बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 12:17 IST

रांजणगाव परिसरातील २६ वर्षीय महिला व तिच्या पतीने वादामुळे सहमतीने घटस्फोट घेतला.

ठळक मुद्देसोशल मीडियावर या दोघा बहिणींची बदनामी केल्याचा प्रकार लक्षात येताच पोलीस स्थानकात तक्रार

वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : घटस्फोटित पत्नी व मेव्हणीची सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्या आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

रांजणगाव परिसरातील २६ वर्षीय महिला व तिच्या पतीने वादामुळे सहमतीने घटस्फोट घेतला. फारकत घेतल्यानंतर ही महिला दोन मुलांसह रांजणगावात वास्तव्यास आहे. तीन महिन्यांपूर्वी १५ मार्चला आरोपी पंजाब शिवानंद थोरवे (रा. शिरपूर, जि. बुलडाणा, ह.मु. रांजणगाव परिसर) याने त्याच्या सोनू थोरवे या फेसबुक व व्हॉटस्‌ॲप अकाउंटवरून घटस्फोटित पत्नीचा फोटो, अश्लील मजकूर, टाकत तिचा मोबाइल नंबरही टाकून तिची बदनामी सुरू केली. यानंतर आरोपीने ९ जूनला घटस्फोटित पत्नीच्या लहान बहिणीचाही अशाच पद्धतीने सोशल मीडियावर फोटो, अश्लील संदेश व तिचा मोबाइल नंबर टाकून बदनामी सुरू केली होती.

बदनामीनंतर पोलीस ठाण्यात तक्रारसोशल मीडियावर या दोघा बहिणींची बदनामी केल्याचा प्रकार लक्षात येताच पीडित घटस्फोटितेने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी पंजाब थोरवेविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइम