शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खैरेंमुळे जिल्ह्याची वाताहत तर जलील यांचे काम उत्तम ; भाजपच्या आमदाराकडून एमआयएम खासदारांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 19:55 IST

BJP MLA Prashant Bamb praises MIM MP Imtiyaz Jalil : माजी खासदार खैरे यांनी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची वाताहत केली आहे.

ठळक मुद्देकराड यांची खैरे कधीच बरोबरी करू शकत नाहीत. खैरेंनी विकास कामात अडथला आणू नये

औरंगाबाद : मराठवाड्यातील भाजपच्या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांवर शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire) यांनी टीका केली. यानंतर भाजप आमदार प्रशांत बंब यांनी खैरे यांना जोरदार प्रत्युत्तर देत ते केंद्रीय मंत्री डॉ. कराड ( DR. Bhagvat Karad ) यांची कधीच बरोबरी करू शकणार नाहीत अशी टीका केली. खैरे यांनी शहर आणि जिल्ह्याची वाताहत केली असा टोला लगावत असताना त्यांनी खासदार इम्तियाज जलील ( imtiyaz Jalil) यांच्या कामाचे कौतुक केले आहे. भाजप आमदाराने एमआयएमच्या खासदारांचे कौतुक केल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. ( The district is in turmoil due to Ex MP Chandrakant Khaire, MP imtiyaz Jalil's excellent work; BJP MLA Prashant Bamb praises MIM MP Imtiyaz Jalil) 

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave )आणि भागवत कराड यांना दिल्लीत असतानाही भेटून शुभेच्छा दिल्या नाहीत. यावर प्रतिक्रिया देताना खैरे यांनी दानवे यांनी माझा पराभव केला आहे, त्यांना मी शुभेच्छा देणार नाही अशी टीका केली. तर डॉ. भागवत कराड यांना मी नगरसेवक, महापौर केले, त्यांची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही. ते मला नेता मानतात. यामुळे दिल्लीत त्यांची भेट घेतली नसली तरी ते मला भेटायला येतील असा चिमटा काढला होता. भाजपचे गंगापूर येथील आमदार प्रशांत बंब यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना यावर प्रत्युत्तर दिले आहे. माजी खासदार खैरे यांनी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची वाताहत केली आहे. कराड यांची खैरे कधीच बरोबरी करू शकत नाहीत. आता कराड आणि दानवे जिल्ह्याचा विकास करतील, खैरेंनी विकास कामात अडथला आणू नये अशी टीका आमदार प्रशांत बंब यांनी केली. 

कराड यांना नगरसेवक, महापौर मी केले; त्यांची माझ्यासोबत तुलना होऊच शकत नाही

एमआयएमचे खासदार जलील यांचे कौतुक खैरेंवर टीका करते वेळी आमदार बंब यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं कौतुक केलं आहे. त्यांचे आणि आमचे मतभेद असले तरी त्यांच्या कामाबाबत त्याचं कौतुक करावं लागेल. शहरात खैरे यांच्यापेक्षा जलील विकासाची काम करत आहेत, हे आपण मानलं पाहिजे. जरी एमआयएम आणि भाजप विरोधक असू, पण जी चांगली काम आहेत त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, असेही बंब म्हणाले.

तेजस ठाकरे युवासेनेच्या प्रमुखपदी ? वरुण सरदेसाई यांनी केले मोठे विधान

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेPrashant Bambप्रशांत बंबraosaheb danveरावसाहेब दानवेBhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबाद