शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा शल्यचिकित्सकांना ‘ओपीडी’ सुरु करणे नडले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 18:15 IST

कालबाह्य औषधी प्रकरणाबरोबर मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे दसर्‍याच्या मुहूर्तावर केलेले पूजन, कोणत्याही राजकीय समारंभाशिवाय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न यासह इतर अनेक बाबी जिल्हा शल्यचिकित्सांना नडल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.

औरंगाबाद : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांना शनिवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कालबाह्य औषधी प्रकरणाबरोबर मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे दसर्‍याच्या मुहूर्तावर केलेले पूजन, कोणत्याही राजकीय समारंभाशिवाय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न यासह इतर अनेक बाबी जिल्हा शल्यचिकित्सांना नडल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.

सामान्य रुग्णालयाच्या उद््घाटनाची नुसती प्रतीक्षा करावी लागत असताना आॅक्टोबरमध्ये उद््घाटनाआधीच दसर्‍याचा मुहूर्त साधून रिकाम्या वास्तूचे पूजन करण्यात आले. यावेळी मंत्रिमहोदयांच्या तारखेची जुळवाजुळव केली जात असताना उद््घाटनाआधीच रुग्णालयाच्या इमारतीचे पूजन उरकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी १० आॅक्टोबरपूर्वी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची तयारी केली. त्यासाठी नाशिक कुंभमेळ्यासाठी घेतलेल्या खाटा रुग्णालयात सज्ज करण्यात आल्या; परंतु कोणत्याही राजकीय समारंभाशिवाय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आरोग्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून थांबविला. या ठिकाणी केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याऐवजी रीतसर उद््घाटन करून सर्व सेवा एकदाच सुरू केल्या जातील, असे म्हणून आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांचे तोंड बंद केले. 

लाखो रुपये खर्चून सामान्य रुग्णालयाची भव्य इमारत बांधण्यात आली; परंतु या रुग्णालयाचा डोलारा जुनाट आणि गंजलेल्या साहित्यावर उभा केला जात होता. नवीन साहित्य मिळण्यास विलंब होत असल्याने ठिकठिकाणांहून साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली. रुग्णालय सुरू करण्यासाठी धडपड होत असली तरी हा प्रकार वरिष्ठ पातळीवर खटकला. यामुळे शासनाची नाचक्की होत होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच २०० नव्या खाटांची आॅर्डर देण्यात आली असून, जुने साहित्य परत पाठविण्याची सूचना करण्यात आली. या सगळ्या प्रकरणांमुळे निलंबनाच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ जिल्हा शल्यचिकित्सांवर आल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.

भोसले यांच्याकडे पदभारडॉ. जी. एम. गायकवाड यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्हा शल्यचिकित्सक  पदाचा प्रभारी पदभार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. व्ही. भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टरAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार