शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानासाठी जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:07 IST

२० वर्षापासून अनुदान मिळण्याच्या आशेवर काम

औरंगाबाद : मागील २० वर्षापासून अनुदान मिळण्याच्या आशेवर काम करत असल्याचे शिक्षकांना अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालकांनी कडकडीत बंद पाळला असल्याची माहिती आंदोलक प्रा. मनोज पाटील यांनी दिली. 

जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तरांची संघटना असलेल्या औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठची बैठक  माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवारी (दि़ २३) पार पडली़  या बैठकीला शिक्षक क्रांतीचे प्रा़  मनोज पाटील, मुख्याध्यापक संघाचे युनूस पटेल, मनोहर सुरगुडे, शिक्षण संस्था महामंडळाचे मिलिंद पाटील, वाल्मिक सुरासे, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे सुभाष मेहर, बिजू मारग, कास्ट्राईबचे देवानंद वानखेडे, अवद चाऊस, प्राथमिक मुख्याध्यापक संघाचे प्रकाश सोनवणे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे प्रदीप विखे, उर्दू शिक्षक संघटनेचे मिर्झा सलीम बेग, शेख मन्सूर, शिक्षक सेनेचे दत्ता पवार, नामदेव सोनवणे, मोहन हाडे, विलास पाटील,  उच्च माध्यमिकचे सुनील वाकेकर, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे  भारत चाटे यांच्यासह अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़   या बैठकीत सोमवारी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी  खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात आल्या.

विना अनुदान तत्वावर कार्यरत शिक्षकांना वेतन देण्यासंदर्भात शासनाकडून अनेकदा आश्वासने देण्यात आली़  परंतु, एकही आश्वासनाची पुर्तता शासनाने केली नाही़  लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे़  ही आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने शाळांना अनुदानित घोषित करून विनावेतन शिक्षकांना न्याय मिळवून द्यायला हवा, या मागण्या शिक्षक संघटना, संस्थाचालकांच्या आहेत.3

इंग्रजी शाळांमध्ये काळ्या फिती लावून कामकाजइंग्रजी शाळा असोशिएशन या संघटनेने शिक्षक, संस्थाचालकांच्या संपाला पाठिंबा देत इंग्रजी शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी दंडाला काळ्या फिती बांधून कामकाजात सहभाग नोंदवला. याला जिल्हाभरातील संघटनांनी प्रतिसाद दिला असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी प्रल्हाद शिंदे हस्तेकर यांनी दिली. 

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकारTeacherशिक्षक