शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूलला गतवैभव प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:19 IST

वजिराबाद परिसरातील मागील अनेक वर्षांपासून अखेरच्या घटिका मोजणाºया जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूलचा पुनर्जन्म झाल्याने ही शाळा पुन्हा एकदा गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभी राहिली आहे़ ही किमया शाळेचे मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे यांच्या अथक प्रयत्नातून साधली़

भारत दाढेल ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वजिराबाद परिसरातील मागील अनेक वर्षांपासून अखेरच्या घटिका मोजणाºया जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूलचा पुनर्जन्म झाल्याने ही शाळा पुन्हा एकदा गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभी राहिली आहे़ ही किमया शाळेचे मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे यांच्या अथक प्रयत्नातून साधली़निजामकालीन ही शाळा त्यावेळी मराठवाड्यात दुसºया क्रमांकाची होती़ शाळेचे बांधकाम १९०२ ते १९१० या काळात झाले आहे. माजी शिक्षण राज्यमंत्री कमलकिशोर कदम, माजी आमदार, स्वातंत्र्य सैनिक साहेबराव देशमुख बारडकर हे या शाळेचे विद्यार्थी. मध्यंतरी शाळेच्या वैभवाची घसरण सुरू झाली़ खासगी शाळा नावारूपाला आल्या, परंतु ही शाळा उपेक्षित राहिली. अलीकडे तर ही ऐतिहासिक वास्तू धर्मशाळा बनली होती़ शाळेला संरक्षक भिंत नसल्याने मैदानावर अतिक्रमण वाढले़ शाळेच्या परिसरात दारूच्या बाटल्या सापडू लागल्या़ मद्यपींची रात्रीची बैठक या ठिकाणी सुरू झाली होती़ शाळा सुधारण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नव्हते़ या इमारतीचे वैभव हळूहळू नष्ट होऊ लागले़ त्यामुळे रम्य वाटणारी ही वास्तु भयाण वाटत होती़ शिक्षक बालासाहेब कच्छवे यांना पदोन्नती मिळून ते शाळेचे मुख्याध्यापक झाले. याच काळात अभिमन्यू काळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आले. काळे यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी मुख्याध्यापक कच्छवे यांनी शाळेच्या दयनीय अवस्थेबद्दल सांगितले. काळे यांनी मदतीचा हात दिला आणि कामाला सुरुवात झाली़ २ आॅक्टोबर २०१६ ते १२ जानेवारी २०१७ या शंभर दिवसांत हा कायाकल्प प्रकल्प सिद्धीस गेला.जुनी ऐतिहासिक वास्तू जतन कशी करायची, यासाठी सुरेश जोंधळे यांचा सल्ला मिळाला. कमी वेळात जास्त काम करण्यासाठी जपानी कायझेन तंत्र वापरले. इमारतीचा रंग उडालेला. सागवानी दरवाजे, खिडक्या, कपाटे, फर्निचर सगळं जुनाट. त्यांना पॉलिश करायचे ठरले़ कारागिरांच्या राहण्याची व्यवस्था कामावरच करण्यात आली़ त्यामुळे त्यांनी ३९ दिवसांत काम पूर्ण केले़शाळेची संरक्षक भिंत बांधून घेतली. साचलेल्या दारूच्या बाटल्यांच्या काचा भिंतीवर लावल्या. त्यामुळे शाळा सुरक्षित झाली. बाग कामामुळे वास्तूला शोभा आली़ सीसीटीव्ही कॅमेºयामुळे प्रत्येक वर्गात काय चालू आहे हे मुख्याध्यापक कार्यालयात बसून बघू- ऐकू लागले़ निजामकाळापासून इथे हवामानाच्या नोंदी घेणारी यंत्रणा आहे. जलमापिका, आर्द्रतामापिका, वायूवेगमापिका, वायूदाबमापक, दिशादर्शक कुकुट यंत्र यावर रोज नोंदी होतात.नवे रूप परिधान करून शाळेची वास्तू आज दिमाखात उभी आहे़