शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पैठण नगर पालिकेचे व्यापारी संकूल पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 19:32 IST

रमेश लिंबोरे यांनी ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना निवेदन देऊन या बाबत कारवाई करण्याची विनंती केली होती.

ठळक मुद्देबांधकाम नियमीत करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित

पैठण : नाथ मंदिरालगत यात्रा मैदानासाठी आरक्षित असलेल्या ( आरक्षण क्र २९) क्षेत्रावर पैठण नगर परिषदेने बांधलेल्या व्यापारी संकुलाचे बांधकाम संपूर्ण निष्काषीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी नगर परिषद प्रशासनास दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

आरक्षीत जागेच्या १५ % क्षेत्रावर वाणिज्य विकास कामास  नगर विकास विभागाने दिलेल्या परवानगीनुसार नाथ मंदीर परिसरात व्यापाऱ्यांना व्यावसायिक गाळे बांधून देण्याचा ठराव मंजूर केला. या नुसार नाथ मंदीर परिसरात व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम उभे केले. दरम्यान, याबाबत पैठण येथील रमेश लिंबोरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याबाबत कारवाई करण्याचे आदेश २०१६ मध्ये जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना दिले होते. परंतु, याबाबत अद्याप कारवाई झाली नव्हती. 

दरम्यान, रमेश लिंबोरे यांनी ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना निवेदन देऊन याबाबत कारवाई करण्याची विनंती केली होती. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी मुख्याधिकारी पैठण यांना आदेश दिले असून या आदेशात असे म्हटले आहे की,  पैठण येथील न.भू.क्र . १०५१. १०५३. १०५४ , १०५६ व १०५७ या महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जागेवर (आरक्षीत यात्रा मैदानावर )  नगर परिषदेमार्फत अतिक्रमण करुन , करण्यात आलेले व्यापारी संकुलाचे बांधकाम पूर्णतः निष्काषीत करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यात यावा. या आदेशाने  व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.  

बांधकाम नियमीत करण्याचा प्रस्ताव शासनाकडेपैठण नगर परिषद तत्कालीन मुख्याधिकारी  यांनी दि. २९ .०३.२०१७ रोजी  प्रकरणाधीन व्यापारी संकुलाचे  बांधकाम नियमित करण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव सादर केलेला आहे. सदर प्रस्ताव , शासन स्तरावर प्रलंबीत असून  अद्याप सदर प्रस्तावास शासनाने मंजुरी प्रदान केलेली नाही. राजकारण बाजुला ठेवून या बाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा झाला असता तर नगर परिषदेच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली असती. मात्र पैठण तालुक्यात पेटलेल्या राजकारणात व्यापाऱ्यांना भरडले जात आहेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करावी पैठण येथील न.भू.क्र . १०५१. १०५३. १०५४ , १०५६ व १०५७ वर नगर परिषदेने व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्यात आले असे न्यायालय व जिल्हा प्रशासनास तक्रारदाराच्यावतीने सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात सदर व्यापारी संकुल या जागेवर नसून ते गावठाणात बांधण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वतः स्थळ पाहणी करून नंतर व्यापारी संकुल निष्काषीत करण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन नगरसेवक दत्ता गोर्डे यांनी केले आहे. नगर परिषदेचे उत्पन्न वाढावे व व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करून हे गाळे बांधण्यात आले आहेत. प्रशासनाने विचार न केल्यास या बाबत न्यायालयात जाणार असल्याचे दत्ता गोर्डे यांनी सांगितले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद