शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

जिल्हाधिकाऱ्यांचे फुलंब्री तहसीलमध्ये 'स्टिंग ऑपरेशन'; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची उडाली धांदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:17 IST

उशिरा येणाऱ्या, गैरहजर कर्मचारी, अधिकाऱ्यांचा एकदिवसाचा पगार कापणार, सर्विस बुकवर करणार नोंद

- रऊफ शेखफुलंब्री : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, शुक्रवारी ( दि. १३ ) सकाळी पावणे दहा वाजेला अचानक फुलंब्री तहसील कार्यालयात पोहचले. हजेरी रजिस्टर ताब्यात घेऊन तपासणी केली असता तहसील कार्यालयातील १६ पैकी फक्त ३ कर्मचारी वेळेवर हजर असल्याचे आढळून आले. तर पंचायत समितीच्या ४५ कर्मचाऱ्या पैकी केवळ दहाच कर्मचारी वेळेवर पोहचले असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांच्या निदर्शनास आले. उशिरा येणाऱ्या व गैरहजर कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयात कर्मचारी कधी येतात? नागरिक कामासाठी कधी येतात ? याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी फुलंब्री येथे गोपनीय दौरा केला. सकाळी पावणे दहा वाजता ते प्रशासकीय इमारतीत पोहचले. या इमारतीमध्ये तहसीलसह भूमिअभिलेख, दारूबंदी, कृषी कार्यालय, पुरवठा विभाग, कोषागार, सहकार विभाग असे सात विविध विभागाचे कार्यालय आहेत. जिल्हाधिकारी स्वामी यांनी रथम इमारतीचे दरवाजे बंद केले. मुख्य दरवाजासमोरच जिल्हाधिकारी खुर्ची टाकून अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसले. 

जिल्हाधिकारी दारात, कर्मचाऱ्यांची धांदलदरम्यान, बाहेर बसूनच जिल्हाधिकारी स्वामी यांनी हजेरी रजिस्टरची पाहणी केली. यावेळी केवळ नायब तहसीलदार संजीव राऊतसह केवळ दोनच कर्मचारी वेळेवर उपस्थित होते. वेळेनंतर एक एक कर्मचारी येत होते. त्यांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी उशिरा येण्याचे कारण विचारले असता कोणालाही उत्तर देता आले नाही. तहसील कार्यालयातील १६ पैकी ३ कर्मचारी दहाच्या आत पोहचले. तर पंचायत समितीमधील ४५ पैकी केवळ १० कर्मचारी वेळेवर आले होते. हजेरी पत्रकाची झेरोक्स प्रत जिल्हाधिकारी स्वामी सोबत घेऊन गेले.

नियमित पाहणी करणारशासकीय कार्यालय येणारे नागरिक व कर्मचारी अधिकारी यांनी पावणे दहा पर्यंत येणे आवश्यक आहे. पावणे दहा वाजता केवळ ३ कर्मचारी आले होते हे योग्य नाही. उशिरा आलेल्या गैरहजर असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा एकदिवसाचा पगार कपात केला जाईल. त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद केली जाईल. यानंतरही सुधारणा झाली नाही तर निलंबनाची कारवाई केली जाईल. तसेच यापुढेही अशी पाहणी करण्यात येईल- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcollectorजिल्हाधिकारीRevenue Departmentमहसूल विभाग