शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधच व्हायला हवी होती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:06 IST

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या २१ मे रोजी होत आहे. निवडणूक लोकशाहीचं लक्षण मानलं तरी सहकारी ...

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या २१ मे रोजी होत आहे. निवडणूक लोकशाहीचं लक्षण मानलं तरी सहकारी बँकेत ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, हे बाजूच्या अहमदनगर जिल्ह्यानं दाखवून दिलं आहे.

सुरेशदादा पाटील हयात असते तर ही निवडणूक त्यांनी बिनविरोधच केली असती. एकतर त्यांना 'बॅंक' कळली होती आणि त्यांचा कल नेहमीच 'बिनविरोध' कडे राहत आला होता. आता दोन पॅनेल आमने-सामने उभे आहेत. दोघांनीही पत्रपरिषद घेऊन आपण का लढतो आहोत हे स्पष्ट केले आहे. तरीही सामोपचाराने एकमेकांची 'अडजस्टमेंट'' ओळखून व समजून निवडणूक टाळायचीच असं ठरवलं असतं तर सारं कसं 'आलबेल' होऊन गेलं असतं. सुरेशदादा पाटील यांची उणीव भासत असतानाच आता निवडणुकीची वेळ येऊन ठेपली आहे.

तर हे आश्चर्य ठरेल...

प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी ही निवडणूक वाटत नाही. शेवटी ही सत्तेची लढाई आहे. पैसा जसा पैसेवाल्यांकडेच जातो अशी म्हण आहे. तसं सत्ता सत्तावाल्यांकडेच जाते. हरिभाऊ बागडे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, सतीश चव्हाण, अंबादास दानवे, नितीन पाटील अशा दिग्गज मंडळींना डॉ. कल्याण काळे व सुभाष झांबड यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल हरवण्याची चमत्कार घडवणार असतील तर ते एक आश्चर्यच ठरावं.

ती चर्चा खोटी ठरली...

अब्दुल सत्तार जिल्हा बँक ताब्यात घेऊन पुत्र समीर सत्तार यांना अध्यक्ष बनवतील अशी एक चर्चा सुरू झाली होती, पण ती खोटी ठरली. कारण कोणत्याच मतदारसंघात समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज आला नाही आणि नितीन पाटील हेच अध्यक्षपदाचे उमेदवार राहतील, हे अधिकृतपणे जाहीरही करण्यात आलं आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी रणनीती शेतकरी विकास पॅनेलने बनवलेली दिसते. त्यामुळेच त्यांनी विद्यमान उपाध्यक्ष दामूअण्णा नवपुते यांचा बळी देऊन आमदार सतीश चव्हाण व आमदार अंबादास दानवे यांना संधी दिली. खरंतर दानवे हे प्रारंभी काळे-झांबड यांच्याबरोबर होते, पण शेतकरी विकास पॅनलनं त्यांना आपल्याकडं ओढून घेतलं

सहकारात पक्ष नसतो हे खरंच....

सहकारात पक्ष नसतो, हे खरंच. तसं नसतं तर काळे-झांबड यांच्या पॅनलमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, मनसेचे दिलीप बनकर दिसले नसते. काळे-झांबड यांच्या पॅनलमधील सोसायटी मतदारसंघात खुलताबादहून किरण पाटील डोणगावकर, कन्नडहून अशोक मगर आणि सोयगावहून रंगनाथनाना काळे हे ''टफ फाइट''देतील. मात्र प्रोसेसिंगमधून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणूक सोपी समजू नये. हरिभाऊ बागडे विरुद्ध डॉ कल्याण काळे व अब्दुल सत्तार विरुद्ध सुभाष झांबड अशी ही निवडणूक आहे. असं म्हणण्याचं कारण उघड आहे. जाणकाऱ्यांच्या तर ते सहज लक्षात येऊ शकतं...