शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

जंतनाशकाच्या गोळ्यांचे वाटप झाले केवळ अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थी राहिले वंचित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 14:22 IST

राज्य कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत सध्या शालेय विद्यार्थ्यांना  जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. परंतु , हे वितरण केवळ अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनांच होत असून विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना या मोहिमेतून वगळल्याचा धक्कादायक प्रकार लासूर स्टेशन येथे उघडकीस आला आहे.

लासूर-स्टेशन ( औरंगाबाद ),दि.२४ :  राज्य कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत सध्या शालेय विद्यार्थ्यांना  जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. परंतु , हे वितरण केवळ अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनांच होत असून विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना या मोहिमेतून वगळल्याचा धक्कादायक प्रकार लासूर स्टेशन येथे उघडकीस आला आहे. या प्रकाराने विना अनुदानित शाळेतील जवळपास ७  शाळेतील ३२०० विद्यार्थ्यांना जंतनाशकाच्या गोळ्या पासून वंचित राहावे लागले आहे. 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य कुटुंब कल्याण कार्यालया तर्फे  १८ ते  २१ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमे अंतर्गत १ ते १९ वयोगटातील शासकीय, अनुदानित, अंगणवाडी एवढेच नव्हे तर शाळा बाह्य मुला मुलींनाही जंतनाशकाच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. मात्र, आश्चर्यकारकरित्या केवळ विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनाच या मोहिमेतून गोळ्याचे वितरण करण्यात आले नाही. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून वर्षातून एकदा प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी केली जाते. यात काही दुजाभाव नाही मग जंतनाशक मोहिमेतूनच विना अनुदानित शाळा का वगळण्यात आल्या ? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

दोन अधिका-यांचे विसंगत उत्तरेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, मान्यता प्राप्त सर्वच शाळेतील पाञ विद्यार्थ्यांना जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात येतात. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश घोडके यांनी सांगितले की, मार्गदर्शक सुचने नुसार आरोग्य विभागाच्या वतीने शासकीय, निमशासकीय, अंगणवाडी व शाळा बाह्य मुला मुलींनाच जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात येतात.

केवळ शासकीय व अनुदानित शाळांमध्ये वाटप शासकीय व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनाच जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. विना अनुदानित व स्वंय साहित शाळेतील विद्यार्थ्यांना मोहिमेतून वगळले आहे. -प्रभाकर पवार , केंद्र प्रमुख

वंचितांना वाटप व्हावेवयोगट प्रमाण मानून सर्वच विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहिमेत समाविष्ट करण्याची गरज होती. वंचित विद्यार्थ्यांनाही जंतनाशकाच्या गोळ्या वाटप करण्यात याव्यात. सुगंधा परेरा,  मुख्याध्यपिका,सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूल                        

मुलांना वंचित ठेवणे चुकीचे आहेजंतनाशकाच्या गोळ्या घेण्यासाठी पात्रता हि १ ते १९ वयोगटातील मुले व मुलीं अशी आहे. यामुळे केवळ विना अनुदानित शाळेतील विद्यार्थी आहे, म्हणून काही जणांना वंचित ठेवणे हे चुकीचे आहे. सर्वच पाञ मुलांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जंतनाशकाच्या गोळ्या मिळवून देण्यासोबतच चुकीच्या असलेल्या मार्गदर्शक सूचना बदलण्यासाठी प्रयत्न करणार.- प्रशांत बनसोड, शिवसेना