शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पंधरवड्यात फक्त पाच बालकांना अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण

By विजय सरवदे | Updated: March 14, 2024 15:48 IST

आतापर्यंत पावणेदोनशे बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण

छत्रपती संभाजीनगर : महिला व बाल विकास विभागाने २३ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यातील अवघ्या ५ बालकांना अनाथ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. अनाथ प्रमाणपत्रासाठी प्राप्त प्रस्तावानुसार बालकल्याण समिती तसेच बालसंरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतरच ही प्रमाणपत्रे देण्यात आली. 

तथापि, अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे वितरित करण्याचे काम निरंतरपणे सुरू असून आतापर्यंत पावणेदोनशे बालकांना प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे या विभागाच्या सूत्रांनी सांगितले. शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडताना त्यांच्याजवळ अनाथ तसेच जातीचे प्रमाणपत्र नसल्यास त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदानाचा लाभ मिळत नाही. परिणामी, प्रमाणपत्राअभावी त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाने बालगृहात दाखल अथवा नातेवाईक सांभाळ करीत असलेल्या व निकष पूर्ण करणाऱ्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात येते. यासाठी महिला व बाल विकास विभागाने २३ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी या विभागाच्या जिल्हा कार्यालयात समर्पित कक्षही स्थापन केला होता.

या मोहिमेद्वारे बालकांना केवळ अनाथ प्रमाणपत्रच नव्हे, तर आधार कार्ड, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड अशी अनेक प्रमाणपत्र देण्याचे नियोजन होते. या मोहिमेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली. सध्या ५ बालकांना दाखले देण्यात आले असले, तरी अनेक बालकांचे विविध दाखल्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयाकडे निर्णयास्तव प्रलंबित आहेत.

संस्थाबाह्य प्रस्ताव निकालीयासंदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या प्रभारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले की, या पंधरवड्यात संस्थाबाह्य आलेल्या प्रस्तावातील ५ बालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घरभेटी देऊन सत्यता पडताळल्यानंतरच अनाथ प्रमाणपत्रे दिली जातात. जिल्ह्यात निरंतरपणे प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू असते. आतापर्यंत जिल्ह्यातील १७० अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsocial workerसमाजसेवक