शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

खरीप अनुदानाचे १0९ कोटी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2016 23:43 IST

हिंगोली : जिल्ह्यात खरीप अनुदानाचे वाटप यावर्षी मोठ्या गतीने करण्यात आले.

हिंगोली : जिल्ह्यात खरीप अनुदानाचे वाटप यावर्षी मोठ्या गतीने करण्यात आले. सेनगाव वगळता इतर सर्व तालुक्यांत ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या याद्या बँकेकडे पोहोचल्या आहेत. काही तुरळक ठिकाणी खात्यावर रकमा जमा होणे तेवढे बाकी आहे. एकूण १0९ कोटी रुपयांचे वितरण झाले आहे.हिंगोली जिल्ह्याला खरीप अनुदानापोटी पहिल्या टप्प्यात ११२.४५ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. एकूण २0१.१७ कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी १११.९0 कोटी रुपये बीडीएसवर उचलण्यात आले. यातून जिल्ह्यातील ७0७ पैकी ४७५ गावांतील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केले आहे. मिळालेल्या रकमेतून १ लाख ५६ हजार ६२८ शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले आहे. तालुकानिहाय हिंगोली-१८७१८, कळमनुरी-३३१७८, सेनगाव-२७५३७, वसमत-४९१६७, औंढा-२८0२८ अशी शेतकरीसंख्या आहे. यामध्ये वाटप करण्यात आलेली खरीप अनुदानाची तालुकानिहाय रक्कम अशी हिंगोली-२३.८२ कोटी, कळमनुरी-२२.२३ कोटी, सेनगाव-२३.२३ कोटी, वसमत-२२.३७ कोटी, औंढा -१७.८९ कोटी रुपये असे वितरण झाले आहे. यात सेनगाव तालुक्यात अजूनही २.१३ कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे.या तालुक्यातील वाटपाला अजून दोन दिवस लागण्याची चिन्हे आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या, रकमा व खातेक्रमांक संबंधित बँकांना दिल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)