शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

औरंगाबादेत सात महिन्यांत ३.३३ लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 14:03 IST

ठरवून दिलेल्या वेळेत ही पाकिटे वाटप न झाल्यास मोफतही वाटप करण्यात आल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देदररोज १८ केंद्रांवर ३ हजार थाळ्या वाटप लाभधारकांनी पोळी, भाजी वाढविण्याची केली मागणी 

औरंगाबाद : जानेवारी महिन्यात सुरू झालेली शिवभोजन योजना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आधार ठरली. शहरात चारच केंद्रांत सुरू झालेली ही योजना आता जिल्ह्यात १८ ठिकाणांहून पाच रुपयांत शिवभोजन थाळी  देत आहे. जुलैअखेर ३ लाख ३२ हजार ३१३ थाळ्यांचे वाटप करण्यात आले. केंद्रांना ठरवून दिलेल्या थाळ्यांचे वाटप झाले नाही तर मोफत वाटप करून कोटा पूर्ण केला जात असल्याचे गुरुवारी दिसून आले. लाभधारकांनी जेवण चांगले मिळत असल्याचे प्रशस्तीपत्र देतानाच भाजीपोळी वाढवण्याची गरज व्यक्त केली.

लोकमत प्रतिनिधीने  बसस्थानक, टीव्ही सेंटर, घाटी रुग्णालयातील शिवभोजन केंद्रांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यात एकूण १८ केंद्र आहेत. त्यापैकी सहा केंद्र शहरात असून १२ केंद्र ग्रामीण भागात आहेत. त्यांना एकूण ३ हजार थाळ्या वाटपाची परवानगी मिळालेली आहे. कोरोनामुळे थाळीऐवजी पॅकिंग फूड दिले जाते. थाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी वरण व भात देण्यात येत असल्याचे घाटीतील केंद्रचालक राजू भैरव यांनी सांगितले. तर लॉकडाऊन काळातही ठरवून दिलेल्या थाळ्यांचे वितरण रोज पूर्ण केल्याचे बसस्थानक येथील केंद्रचालक उपिंदर मल्होत्रा म्हणाले.

१७ केंद्रांतून २३४५ पाकिटांचे वाटपया योजनेतून थाळीचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅपद्वारे नोंदणी करण्यात येते. त्याची आकडेवारी थेट अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वितरण प्रणालीवर कळते. गुरुवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत २३४५ थाळ्यांचे वाटप झालेले होते, तर १८ पैकी शहरातील शिवाजीनगर येथील केंद्रावर एकही थाळी वाटप करण्यात आलेली नव्हती. केंद्रचालकांना मंजूर थाळ्यांचे अन्न पाकीट तयार होते. ठरवून दिलेल्या वेळेत ही पाकिटे वाटप न झाल्यास मोफतही वाटप करण्यात आल्याचे दिसून आले.

 

शिवभोजन थाळ्यांच्या वाटपाची आकडेवारी

महिना :     थाळ्यांचे वाटपजानेवारी :     २,७९०फेब्रुवारी :     १४,६२९मार्च :     १९,८९३एप्रिल :     ६७,०१७मे :     ७०,९८८जून :     ७८,४९४जुलै :     ७८,५०२एकूण :     ३,३२,३१३ 

नातेवाईक नव्हते तरी अडचण आली नाहीगेल्या आठ दिवसांपासून घाटीत पत्नी भरती आहे. इथे कोणी नातेवाईक नाही; परंतु शिवभोजनामुळे इथे जेवणाची अडचण आली नाही. वरण-भातासोबत रोज वेगळी भाजी असते.- गंगाधर दुतोंडे, भोकरदन

पैसे नसले तरी मोफत भोजनमला कोणीच नसल्याने मी दोन महिन्यांपासून घाटीच्या नातेवाईकांच्या निवाऱ्यात राहते. माझ्याकडे पैसे नाहीत; परंतु मोफत शिवभोजन मिळते. चांगले व पोटभर जेवण होते. -शेख नसीम, बीड

भाजी व पोळी वाढविली पाहिजेबसस्थानकाजवळ एका इमारतीवर काम करतो. दुपारचे जेवण मी बसस्थानकातील शिवभोजन केंद्रावरून पाकीट घेऊन करतो. पोळी आणि भाजी वाढवून दिली पाहिजे; पण किंमत वाढवू नये.- सुरेश जाधव, सिडको 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न