शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाकडे दुर्लक्ष; पैठण तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचे काढले निवडणूक पूर्व आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:02 IST

gram panchayat election राज्य शासनाने निवडणूक पूर्व काढलेले आरक्षण रद्द केलेले असताना पैठण तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीचे आरक्षण निवडणूक पूर्व काढण्यात आले आहे.

ठळक मुद्देपैठण तालुक्यात १०८ पैकी ८० ग्रामपंचायतीच्या निवडणूका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. उर्वरित २८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका दुसऱ्या टप्प्यात दोन वर्षांनंतर होणार आहेत

पैठण : पैठण तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीचे आरक्षण शनिवारी काढण्यात आले. यातील ८० ग्रामपंचायतींची निवडणूक झाल्यानंतर तर २८ ग्रामपंचायतीचे आरक्षण निवडणूक पूर्व काढण्यात आल्याने मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासनाने निवडणूक पूर्व काढलेले आरक्षण रद्द केलेले असताना पैठण तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीचे आरक्षण निवडणूक पूर्व काढण्यात आले आहे.

पैठण तालुक्यात १०८ पैकी ८० ग्रामपंचायतीच्या निवडणूका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. उर्वरित २८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका दुसऱ्या टप्प्यात होणार असून या निवडणुकांना अद्याप दोन वर्षाचा अवधी बाकी आहे. परंतु शनिवारी तहसील प्रशासनाने चक्क १०८ ग्रामपंचायतीचे आरक्षण काढल्याने  राज्य सरकारच्या निवडणुका नंतर सरपंच पदाचे आरक्षण काढत या आदेशाची पायमल्ली झाली असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणूक पूर्व सरपंच पदाचे काढलेले आरक्षण राज्य सरकारने रद्द करून निवडणूका झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचे आदेश दिल्याने यानुसार राज्यात निवडणुकीपूर्वी काढलेले आरक्षण रद्द करून नव्याने सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले आहे. 

या ग्रामपंचायतीच्या निवडणूका अद्याप बाकी :पैठण तालुक्यातील आपेगाव ,खेर्डा, शेवता, तांडा बु, खादगाव, बीडकीन, शेकटा तारू पिंपळवाडी, मुधलवाडी, नारायणगाव, हिरापूर, धुपखेडा, जांभळी, बोकूड जळगाव, टाकळी पैठण, देवगाव, कृष्णापूर, गेवराई बाशी, पोरगाव, आडूळ, सालवडगाव, चिंचाळा, नांदर, धनगाव, वरवंडी खु, दिन्नापूर, वडवाळी, कुरणपिंप्री या ग्रामपंचायतीच्या निवडणूका दुसऱ्या टप्प्यात होणार असून यासाठी दोन वर्षाचा कालावधी अद्याप शिल्लक आहे. परंतु, शनिवारी या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत