शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्ही मलाच का अडविले'; माजी सैनिकाची दंडाची पावती देणाऱ्या फौजदारास जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 12:42 IST

तुम्ही मला बाराशे रुपये दंड का लावला, असे म्हणून फौजदार बनसोड यांच्या अंगावर सानप धावून आला आणि शिवीगाळ करू लागला. 

ठळक मुद्देशहरातील महावीर चौकातील घटना  माजी सैनिकाविरोधात गुन्हा दाखल 

औरंगाबाद : वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी आपल्याला बाराशे रुपये दंड लावल्याचे समजताच चिडलेल्या माजी सैनिकाने फौजदारासोबत वाद घालून त्यांना हेल्मेट मारले आणि त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. यावेळी फौजदाराच्या मदतीला आलेल्या हवालदाराच्या बोटालाही त्याने चावा घेतल्याची घटना महावीर चौकात २६ मे रोजी दुपारी घडली. या घटनेप्रकरणी आरोपी माजी सैनिक भगवान कृष्णाजी सानप (वय ५५, राजयश्री कॉलनी, मुकुंदवाडी) याच्याविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला.

या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, छावणी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड हे आणि कर्मचारी बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास वाहतूक नियमन करीत होते. यावेळी विना हेल्मेट दुचाकीस्वार सानपला त्यांनी अडविले. यावेळी तुम्ही मलाच का अडविले, असे म्हणून त्याने फौजदार बनसोड यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्याची समजूत काढून पोलिसांनी त्याच्याजवळ गाडीची कागदपत्रे नव्हती, म्हणून दंड लावायला सांगून त्याला सोडून दिले. सुमारे एक वाजेच्या सुमारास सानप महावीर चौकात दुचाकी घेऊन आला. तुम्ही मला बाराशे रुपये दंड का लावला, असे म्हणून फौजदार बनसोड यांच्या अंगावर सानप धावून आला आणि शिवीगाळ करू लागला. 

शिव्या देऊ नका असे सांगत असताना सानपने दुचाकीला लावलेले हेल्मेट घेतले आणि बनसोड यांना मारले. यावेळी बनसोड त्याचा प्रतिकार करीत असताना सानपने त्यांच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाला चावा घेतला. यामुळे त्यांचे बोट रक्तबंबाळ झाल्याने ते ओरडले. तेथे जवळच असलेल्या हवालदार माळी त्यांच्या मदतीला आले असता सानपने त्यांच्याही डाव्या हाताच्या बोटाचा चावा घेऊन त्यांना जखमी केले. यावेळी अन्य पोलीस कर्मचारी आणि रिक्षाचालकांनी त्यांना पकडून शांत केले. यानंतर वेदांतनगर ठाण्यात त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद