शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळात उरकले उड्डाणपुलाचे नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:22 IST

सिडको येथे वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलास मनपाने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे नाव देण्याचा कार्यक्रम रविवारी सकाळी आयोजित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको येथे वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलास मनपाने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे नाव देण्याचा कार्यक्रम रविवारी सकाळी आयोजित केला. या कार्यक्रमास विरोध करीत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.दोन वर्षांपूर्वी सिडकोतील उड्डाणपुलास वि.दा. सावरकर यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेने घेतला होता. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेने सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास या पुलाचा नामकरण सोहळा आयोजित केला होता. तत्पूर्वीच राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्यकर्ते सिडको उड्डाणपुलाच्या ठिकाणी जमा झाले व या पुलास वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी घोषणाबाजी त्यांनी सुरू केली. तेव्हा महापौर नंदकुमार घोडेले, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट यांनी बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मग उड्डाणपुलाचा नामकरण सोहळा पार पडला.यावेळी खा. चंद्रकांत खैरे, उपमहापौर विजय औताडे, किसनचंद तनवाणी, विकास जैन, सभापती गजानन बारवाल, देवजीभाई पटेल, दयाराम बसैये, आनंद तांदुळवाडीकर, अनिल पैठणकर, भाऊ सुरडकर, भाऊसाहेब जगताप आदींच्याप्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहारअर्पण करून अभिवादन करण्यात आले.आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्नराष्ट्रीय बंजारा परिषदेचे डॉ. कृष्णा राठोड, रविकांत राठोड, दत्ताभाऊ राठोड, विकास जाधव, रविराज राठोड, सुनील चव्हाण या कार्यकर्त्यांनी या उड्डाणपुलास वसंतराव नाईक यांचेच नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली. मात्र, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या साहाय्याने आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.पुलाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी यावेळी गोरसेनेच्या वतीने डॉ. जीवन चव्हाण, मधुकर पवार, योगिराज राठोड, डॉ. विलास राठोड, विशाल राठोड, राजू चव्हाण, मिथुन पवार, दिगंबर राठोड या पदाधिका-यांनी निदर्शने केली.भावना दुखाविण्याचाप्रश्नच नाहीनामकरण सोहळ्याप्रसंगी खा. खैरे म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्याविषयी आम्हालाही आदर आहे. महापालिकेने सावरकर यांचे नाव उड्डाणपुलाला देण्याबाबतचा ठराव घेतला होता. त्यामुळे कोणाच्या भावना दुखाविण्याचा प्रश्नच नाही. याचवेळी महापालिकेच्या पदाधिकाºयांनी मात्र, या पुलावर दोन्ही महापुरुषांची नावे कोरण्याचा अफलातून तोडगा काढला.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरVasantrao Naikवसंतराव नाईक