शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या धनंजय मुंडेंना बडतर्फ करा: अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: February 4, 2025 18:47 IST

मुंडेंचे एकानंतर एक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर येत आहे, हे सरकार भ्रष्टाचाराला, गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे आहे.

छत्रपती संभाजीनगर: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी नॅनो डीएपी, नॅनो युरीया आणि फवारणी पंप खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. हा प्रकार म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भ्रष्ट मुंडेंना बडतर्फ करावे, मंत्र्यापासून ते सचिवापर्यंत सर्वांवर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

आ. दानवे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषदेत   पुराव्यानिशी धंनजय मुंडे यांनी नॅनो डिएपी, नॅनो युरीया तसेच फवारणी पंप खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. कृषी विभागाच्या तत्कालीन सचिवांनी डीबीटी बाहेर खरेदी करण्याची प्रक्रिया राबववून सरकारची आणि शासनाची फसवणूक केली आहे. यामुळे याप्रकरणात मंत्र्यापासून ते सचिवांपर्यंत सर्वांवर गुन्हे दाखल केले जावे,अशी आपली मागणी असल्याचे आ. दानवे म्हणाले. मुंडेंचे एकानंतर एक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर येत आहे, असे असताना हे सरकार भ्रष्टाचाराला, गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे आहे. लाडक्या बहिणींचे कुंकू पूसणारे सरकार असल्याचा आरोप आ.दानवे यांनी केला. यामुळे सरकारने तातडीन मुंडेचा राजीनामा घ्यावा,अन्यथा आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही आ. दानवे यांनी दिला.

मुंडे, कराड एकाच नाण्याच्या दोन बाजूसंतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात धनंजय मुंडेंवर खूनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता आ. दानवे म्हणाले की, जरांगे यांची भूमिका योग्यच आहे. मुंडेच्या पाठिंब्यानेच कराड टोळीची मस्ती,दादागिरी बीडमध्ये वाढली आहे. कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेही एकाच न्यायाच्या दोन बाजू आहेत. पीक विमा घोटाळा, संतोष देशमुख हत्या आणि खंडणीचा प्रकार हा कोणाच्या आर्शिवार्दाशिवाय होऊच शकत नाही. कराड शिवाय मुंडेचे पानही हालत नाही.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेDhananjay Mundeधनंजय मुंडेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर