शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहांिसक दरवाजांच्या ढासळू लागल्या चिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:43 IST

शहरातील ऐतिहासिक, शैक्षणिक ठिकाणांकडे जाण्यासाठी महत्त्वाचे मार्ग असलेल्या साडेतीनशे वर्षांच्या बारापुल्ला, महेमूद आणि मकई दरवाजांची विदारक अवस्था बनली आहे.

ठळक मुद्देबारापुल्ला, महेमूद आणि मकईगेट : नेस्तनाबूत होण्याची मनपा, वक्फ बोर्ड, पुरातत्व विभागाला प्रतीक्षा?

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक, शैक्षणिक ठिकाणांकडे जाण्यासाठी महत्त्वाचे मार्ग असलेल्या साडेतीनशे वर्षांच्या बारापुल्ला, महेमूद आणि मकई दरवाजांची विदारक अवस्था बनली आहे. महेमूद दरवाजाचे दगड निखळू लागल्यामुळे पोलिसांनी तेथून होणारी वाहतूक बंद केली. बारापुल्ला दरवाजाच्या बाजूने भिंत पाडून वाहतूक सुरू केली, तर मकई दरवाजाही ढासळू लागला आहे. महापालिका, पुरातत्व विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रश्न गेल्या २० वर्षांपासून रखडलेला आहे. संबंधित यंत्रणा दरवाजेच नेस्तनाबूत होण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाल्याची उद्विग्न प्रतिक्रिया इतिहासतज्ज्ञांनी व्यक्त केली.ऐतिहासिक दरवाजातून जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी असताना रविवारी मध्यरात्री महेमूद दरवाजातून एक ट्रक नेण्यात आला. या ट्रकमुळे दरवाजाच्या कमानीचे काही दगड निखळले आहेत. काही भाग खाली पडला. वाहतुकीसाठी धोकादायक बनल्यामुळे पोलिसांनी सोमवारी दरवाजातून होणारी वाहतूक बंद केली.या बंद केलेल्या वाहतुकीमुळे बारापुल्ला आणि मकई दरवाजातील वाहतुकीवर प्रचंड ताण आला आहे. लाखो लोक या तिन्ही दरवाजांतून ये-जा करीत होते. हा ताण आता दोन दरवाजांतील रस्त्यांवर आल्यामुळे सतत ट्रॅफिक जाम होत आहे. याचा देश-विदेशातील फटका बसत आहे. १९९५ पासून साडेतीनशे वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या दरवाजातील तिन्ही पुलांना पर्यायी मार्ग निर्माण करण्याची चर्चा केली जात आहे. तेव्हापासून आजपर्यंत निव्वळ चर्चाच केली जाते. एकवेळा या तिन्ही पुलांसाठी २०१२ मध्ये १३ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र, महापालिकेतील प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या टोकाच्या अनास्थेमुळे हा निधीही खर्च न केल्यामुळे परत गेल्याचा प्रकार घडला. आता निधी केव्हा मिळणार आणि पुलांचे काम कधी होणार, हा प्रश्न अधांतरीच आहे.राजकीय आश्वासने अन् टोलवाटोलवीबारापुल्ला, महेमूद आणि मकई दरवाजातून होणाºया वाहतुकीला पर्याय मार्ग काढण्यासाठी दरवाजांच्या शेजारूनच पुलांच्या निर्मितीसाठी तत्कालीन आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मागणीनुसार तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.या पुलांची उभारणी राज्य सरकारच्या एमएसआरडीसीमार्फत करण्यात येणार होती.तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. पुुरुषोत्तम भापकर यांनी जानेवारी २०१३ मध्ये पावसाळ्यापूर्वी तिन्ही पुलांची उभारणी करण्याची राणाभीमादेवी थाटात घोषणा केली. यासाठी बारापुल्लागेटच्या परिसरातील काही अतिक्रमणेही हटवली होती.राज्य सरकारने पुलांच्या उभारणीसाठी निधी दिला. मात्र, काही २४ मालमत्तांच्या भूसंपादनासाठी लागणारा निधी देण्याविषयी महापालिकेने अनास्था दाखवली. यामुळे हे काम बारगळले. निधी खर्च केला नाही.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ११ मे २०१५ रोजी तत्कालीन अल्पसंख्याकमंत्री एकनाथ खडसे यांनी महेमूद दरवाजाच्या पर्यायी पूल आणि रस्त्यासाठी वक्फ बोर्डामार्फत १० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली.तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनीही जिल्हा नियोजन निधीतून (डीपीडीसी) तिन्ही पुलांसाठी निधी देण्याची घोषणा केली. यासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना केल्या.तिन्ही पुलांच्या सुधारित अंदाजपत्रकानुसार पूल उभारणीचा खर्च २७ कोटींवर पोहोचला. भूसंपादनाचा खर्च अतिरिक्त.राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१६ च्या अर्थसंकल्पीय आढावा बैठकीत तिन्ही पुलांसाठी निधी देण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही.

टॅग्स :historyइतिहासAurangabadऔरंगाबाद