शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश आजारांचा जिल्ह्याला विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:18 IST

जिल्ह्याला आॅगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश आजारांनी विळखा घातला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्याला आॅगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश आजारांनी विळखा घातला आहे. जिल्ह्यामध्ये महिनाभरात ६३ संशयित रुग्ण आढळले. यामध्ये तिघांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºयांची संख्या लक्षात घेता संशयित रुग्णांचा आकडा वाढू शकतो; परंतु आरोग्य यंत्रणा परिस्थिती चिंताजनक नसल्याचाच दावा करीत आहे.मुकुंदवाडी परिसरातील राजीव गांधीनगरातील १२ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा डेंग्यूसदृश आजाराने गुरुवारी रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जानेवारीपासून जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे एकूण ६ रुग्ण समोर आले होते. यामध्ये २ ग्रामीण तर ४ शहरातील होते. सात महिन्यांच्या कालावधीत ६ रुग्ण आढळले; परंतु आॅगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ झाली.आॅगस्टमध्ये पडलेल्या पावासामुळे ठिकठिकाणी पाणी साचून डास उत्पत्तीला हातभार लागला. त्यामुळे अनेकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली.जिल्ह्यातील ६३ संशयित रुग्णांमध्ये महापालिका हद्दीतील ३२ रुग्णांचा समावेश आहे. यात ग्रामीण भागात एक तर शहरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. हे तिन्ही रुग्ण आॅगस्टमधील आहेत. डेंग्यूसदृश आजाराने कोणाचा मृत्यू झाला, याची माहिती प्राप्त झालेली नाही, असे जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील म्हणाले.पावसाळ्याला सुरुवात होताच कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर देण्यात आला. शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले, तरीही औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले.