शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:23 IST

चौधरी यांची गेल्या वर्षीच बदली होणार होती; परंतु विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बदलीला ब्रेक लागला.

ठळक मुद्देराज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निश्चित झाले आहे.

औरंगाबाद : जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे. ते मुंबईला बदलून जाणे शक्य असून, त्यांच्या जागेवर येण्यासाठी अनेकांमध्ये स्पर्धा लागली आहे. स्पर्धेमुळे औरंगाबादचे नवीन जिल्हाधिकारी कोण, याबाबत आता उत्सुकता आहे.

चौधरी यांची गेल्या वर्षीच बदली होणार होती; परंतु विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बदलीला ब्रेक लागला. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये प्रशिक्षण घेऊन आल्यानंतरच चौधरी यांची बदली होणार अशी चर्चा सुरू झाली होती. ते  १५ मार्च रोजी प्रशिक्षणावरून आले आणि त्यादरम्यानच कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने उपाययोजनांची सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांची बदली होऊ शकली नाही. आता त्यांची बदली होण्याचे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. 

राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना झाल्या असून, पूर्ण प्रशासकीय यंत्रणा एकत्रितपणे काम करीत आहे. त्यामुळे नवीन बदलून येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना येथे काम करताना काहीही अडचणी येणार नाहीत, अशी शासनाची धारणा झाल्यामुळे जिल्हाधिकारी चौधरी यांचा बदली होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश असल्याची चर्चा आहे.  दरम्यान, जिल्हाधिकारी चौधरी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, याबाबत मला काहीही माहिती नाही. बदलीचे निर्णय शासन स्तरावर होतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTransferबदलीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद