शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाची शहर बस खरेदीसाठी चार कंपन्यांसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:34 IST

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बुधवारी निदर्शनास आले.

ठळक मुद्देमनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी चारही कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्री-बीड मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा केली.

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बुधवारी निदर्शनास आले. चार नामांकित कंपन्यांनी बस गाड्या पुरविण्यासाठी होकार दर्शविला. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी चारही कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्री-बीड मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा केली.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत बस खरेदीचा निर्णयही सहा महिन्यांपूर्वी झाला. कंपनीच्या संचालक मंडळाने बस खरेदीच्या निविदा काढण्यास मान्यता दिली नव्हती. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मुंबईला जाऊन स्मार्ट सिटीचे मेन्टॉर सुनील पोरवाल यांची भेट घेऊन परवानगीही मिळविली. त्यानंतर लगेचच निविदाही प्रसिद्ध केली. निविदेंतर्गत बुधवारी   डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात इच्छुक कंपन्यांसोबत बैठक झाली.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, स्मार्ट सिटीचे नोडल अधिकारी सिकंदर अली यांच्यासमोर कंपन्यांनी सादरीकरण केले. व काही सूचनाही केल्या. यामध्ये अशोक लेलॅण्ड, टाटा, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, एसएमएल आणि आयशर या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.बैठकीत सुरुवातीला निविदेच्या अटी-शर्र्तींवर सविस्तर चर्चा झाली. काही अटी-शर्र्तींमध्ये बदल करण्याची सूचना प्रतिनिधींकडून करण्यात आली.  या सर्व सूचनांचा विचार करून बस खरेदीच्या अटी-शर्ती अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष निविदा दाखल करून घेण्यास सुरुवात होईल. निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत ६ जुलै आहे. ९ जुलै रोजी प्राप्त निविदांमधील टेक्निकल बीड उघडण्यात येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमर्शिअल बीड उडण्यात येणार आहेत.बस खरेदीची निविदा प्रक्रिया महिनाभर चालणार आहे. त्यामुळे दिवाळीआधी बससेवा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दहा मिनिटाला बस मिळावी असे नियोजनमहापालिका पहिल्या टप्प्यात १०० बसेस खरेदी करणार आहे. ९ मीटर लांबीच्या मिडी बसेस राहणार आहेत. यातील काही वातानुकूलित, तर काही विनावातानुकूलित राहणार आहेत. शहरातील २० ते २२ प्रमुख रस्त्यांवर किमान दहा मिनिटाला एक बस मिळावी यादृष्टीने अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. नंतर आणखी ५० बसेस खरेदी करण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद