शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जायकवाडी धरणातून ४९ दिवसात ७८ टीएमसी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 18:59 IST

जायकवाडी धरणातून सन १९७५ पासून विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडण्याचे यंदाचे हे २१ वे वर्ष

ठळक मुद्देसप्टेंबर ५ पासून धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ झालाया पूर्वी धरणातून १५ ते १७ दिवस पाणी सोडल्याची नोंद आहे.विसर्ग आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता

पैठण : जायकवाडी धरणातून गेल्या ४९ दिवसापासून विसर्ग करण्यात येत असून या कालावधीत धरणातून आणखी एक धरण भरेल ईतके पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणाच्या ईतिहासात २००६ ला सर्वाधिक १०२ टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, त्यानंतर यंदा आजच्या तारखेपर्यंत ७८ टिएमसी पाणी सोडण्यात आले असून अद्याप धरणातून विसर्ग सुरू असल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणातून सन १९७५ पासून विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडण्याचे यंदाचे हे २१ वे वर्ष असून यंदा जायकवाडी धरणा बाबत प्रचलित  नोंदी सोडून आगळ्या वेगळ्या नोंदी झाल्या आहेत. सप्टेंबर ५ पासून धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असून सतत ४९ दिवस पाणी सोडण्याचा यंदा विक्रम झाला आहे. या पूर्वी धरणातून १५ ते १७ दिवस पाणी सोडल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे यंदा धरणातून अद्यापही विसर्ग सुरू असून विसर्ग आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता धरण अभियंता संदिप राठोड यांनी  केली आहे. दरवर्षी नाशिक-नगरच्या पाण्यावर अवलंबून असलेले धरण यंदा आत्मनिर्भर झाल्याचे समोर आले आहे. स्थानिक पाणलोट क्षेत्रात यंदा जोरदार पाऊस झाल्याने दोन वेळेस धरण भरेल ईतके पाणी जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रातून दाखल झाले आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून यंदा १० टिएमसी पाणी दाखल झाल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

यंदा ४९ दिवसात ७८ टिएमसी विसर्ग......जायकवाडी धरणातून विसर्ग सध्याही सुरू असून गेल्या ४९ दिवसात धरणातील एकूण जीवंत साठ्यापेक्षा जास्त म्हणजे ७८ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या दरवाजातून २१०२ दलघमी, जलविद्युत प्रकल्पातून २८ दलघमी व उजव्या कालव्यातून १७ दलघमी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.

१९७५ पासून विसर्ग; यंदाचे २१ वे वर्षजायकवाडी धरणाच्या दरवाज्यांचे काम बाकी असताना १९७५ मध्ये पैठण येथून ३९८५२ क्युसेक्स विसर्ग झाल्याची नोंद आहे. १९७६ ला धरणाचे २७ दरवाजे ८ इंचाने उचलून प्रथमच १५०,००० क्युसेक्स असा विसर्ग करण्यात आला. १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष  धरणातून विसर्ग करावा लागला. १९८२ ला विसर्ग करावा लागला नाही मात्र १९८३ ला ८०१९५ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला. १९८४ ते १९८७ या चार वर्षात धरणात अपेक्षित जलसाठा न झाल्याने विसर्ग करावा लागला नाही. १९८८ ला नाममात्र विसर्ग करण्यात आला. पुन्हा १९८९ हे वर्ष कोरडे गेले. १९९० ला महापूर आल्याने १८७६५२ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करावा लागला. १९९१ लाही ५९४०८ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग झाला. १९९२ ते १९९७ या सहा वर्षात १९९४ ला पाणी सोडावे लागले बाकीचे वर्षे कोरडेच राहिले. यानंतर १९९८ व ९९ सलग दोन वर्ष विसर्ग झाला.

२००० नंतर धरण भरण्याचे प्रमाण घटलेसन २००० ते २०२० या २१ वर्षाच्या दरम्यान  १४ वर्ष धरणातून पाणी सोडण्याचा प्रसंग आला नाही. २००० ते २००४ व २००९ ते २०१६ असे सलग व २०१८  या दरम्यान धरणातील जलसाठा काटकसरीने वापरावा लागला. मात्र या २१ वर्षात २००५ ते २००८ या दरम्यान धरणातून मोठ्या क्षमतेने पाणी सोडावे लागले.  २०१७ ला २७८४६ क्युसेक्स व २०१९ ला ५०३०४ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग केला गेला. यंदा ९४००० क्युसेक्स जास्तीत जास्त क्षमतेने विसर्ग झाला आहे.

१९९० व २००६ ला पैठण शहरात पूर.....१९९० ला १२ ऑक्टोबर रोजी धरणातून १८७६५२ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला होता. पैठण शहराखालील बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच उघडण्यात अपयश आल्याने पैठण शहरात पुर आला होता. २००६ ला धरणातून ऑगस्ट महिण्यात २,५०,६९५ असा मोठा विसर्ग करण्यात आल्याने सहा दिवस अर्धे पैठण शहर पाण्याखाली होते. यंदा सुरक्षित विसर्ग झाल्याने गोदाकाठच्या तालुक्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद