शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या प्रतीक्षेनंतरही निराशाच; औरंगाबादची रेल्वे पीटलाईन अखेर जालन्याला पळवली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 18:43 IST

राज्य शासनाने जमीन दिली तरच चिकलठाण्यात पीटलाईन शक्य होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद : औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली रेल्वेची पीटलाईन अखेर जालन्याला पळविण्यात आली आहे. पीटलाईन जालन्यात करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केली.

औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाईनची प्रतीक्षा केली जात होती. रेल्वेची पीटलाईन आधी औरंगाबाद रेल्वे स्टेशन आणि नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे कामही रेल्वेने हाती घेतले. मात्र चिकलठाण्यात रेल्वेची जागा अपुरी आहे. राज्य शासनाने जमीन दिली तरच चिकलठाण्यात पीटलाईन शक्य होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्याच वेळी जालन्यातही जागेची पाहणी झाली. त्यामुळे पीटलाईन जालन्याला जाण्याचे संकेत मिळाले होते. अखेर जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा रविवारी दानवे यांनी केली.

औरंगाबादेत जागेचा शोध असफलऔरंगाबादेत २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी पीटलाईनसाठी औरंगाबादेत महिनाभरात जागा शोधण्याची जबाबदारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड आणि खा. इम्तियाज जलील यांच्यावर सोपवली होती.

निकष पूर्ण करणारे शहर असूनही...द. म. रेल्वेच्या मुख्यालयाकडून २०१७ मध्ये पीटलाईनला मंजुरी मिळाली होती. परंतु ती पुढे विविध कारणांनी अडविली गेली. संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात औरंगाबाद हे एक मोठे शहर आहे. पीटलाईनसाठीचे सर्व निकष औरंगाबाद पूर्ण करते.

पीटलाईन नसल्याचा काय तोटा?पीटलाईन नसल्यामुळे औरंगाबादहून नव्या रेल्वेगाड्या सुरू होण्यास अडचणी येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात आले. आता जालन्याला पीटलाईन होणार असल्याने जालन्याहूनच नव्या रेल्वे सुरू होतील.

आधीच माहीत होते...काही ना काही कारण पुढे करून पीटलाईन जालन्याला नेली जाणार आहे, हे आधीच माहीत होते. पण रेल्वेची प्रत्येक गोष्ट जालन्याला नेता कामा नये. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादेत पीटलाईनची प्रतीक्षा केली जात होती. आता भाजपचे औरंगाबादचे लोकप्रतिनिधी यावर काय बोलणार, हा प्रश्न आहे.- खा. इम्तियाज जलिल

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाrailwayरेल्वे