शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

केबिनमधून थेट वर्गात; कुलगुरू विजय फुलारी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र शिकवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:17 IST

१ जुलैपासून होणार तासिकांना सुरुवात, नित्याने तास घेण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : तुम्हाला जगात बदल घडवून आणायचा असेल, तर त्याची सुरुवात स्वत:पासून करा, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. त्याची प्रचिती आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येईल. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ जुलैपासून प्रत्यक्ष अध्यापनास विद्यापीठात सुरुवात होणार आहे. त्यावेळी एक विषय कुलगुरू स्वत: शिकविणार आहेत. त्यानुसार वेळापत्रक बनविण्याच्या सूचना विभाप्रमुखांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या परीक्षांमध्ये विविध महाविद्यालयांतील केंद्रांना भेटी दिल्या, तेव्हा त्याठिकाणची दृश्ये पाहून कॉपीमुक्त परीक्षेची कडकपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सुरुवातीला शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. हा बदल स्वत: पासून घडवण्याचा विडाच जणू फुलारींनी उचलला आहे. अनेक महाविद्यालयांसह विद्यापीठातील काही विभागांमध्ये प्राध्यापक तासिकाच घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यासाठी कुलगुरूंनी मोहीमच उघडली आहे. एकही विद्यार्थी आला, तरी त्यासाठी तास घेण्याची तंबी दिली. त्याचवेळी स्वत: भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे पहिल्या सत्राला एक विषय शिकविण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी घेतला आहे. त्यासाठी विद्यापीठातील भौतिकशास्त्राच्या विभागप्रमुखांना त्यानुसार वेळापत्रक बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुलगुरूंनीच वर्गावर जाऊन तास घेण्याचे ठरविल्यामुळे इतर प्राध्यापकांनाही तास घेणे बंधनकारक होणार आहे.

‘त्या’ प्राध्यापकांची यादी पोहचलीविद्यापीठातील अनेक विभागांत काही विशिष्ट प्राध्यापक वेळेवर येत नाहीत. विभागात आल्यानंतर तासिकांवर जात नाहीत. गेले तरी उशिरा जातात व लवकर निघून येतात. काही जण स्वत:कडे पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना वर्गावर पाठवितात. तसेच, विद्यार्थी कमी असल्यामुळे केबिनमध्येच बोलावून तास घेतात, अशा प्राध्यापकांची यादीच कुलगुरूंकडे पोहोचल्याचे समजते. त्यामुळे कुलगुरू कोणत्याही वेळी संबंधित प्राध्यापकांच्या वर्गांना अचानक भेटी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१ तास विद्यार्थ्यांना शिकविणारआयुष्यभर भौतिकशास्त्राचे अध्यापन केले आहे. येत्या १ जुलै रोजी विभागातील तासिकांना सुरुवात होणार आहे. तेव्हा, एक विषय शिकवणार आहे. सकाळी ९ वाजताच कार्यालयात येतो. त्याठिकाणी एक तास काम केल्यानंतर १० वाजता भौतिकशास्त्र विभागात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणार. त्यानंतर विद्यापीठातील एक-दोन विभागांना अचानक भेटी देऊन पाहणी करीत पुन्हा ११:३० वाजता कार्यालयात परतण्याचे नियोजन केले आहे.- डॉ. विजय फुलारी, कुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र