शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना थेट हज यात्रा; कम्पेनियनचे वय १८ ते ६० केल्याने रोष

By मुजीब देवणीकर | Updated: August 10, 2024 20:10 IST

सौदी अरेबिया सरकाने यंदा भारतातून १ लाख ७५ हजार २५ हज यात्रेकरूंना पाठविण्याची मुभा दिली.

छत्रपती संभाजीनगर : पवित्र हज यात्रेला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाने सोमवारी २०२५-२६ या वर्षासाठी हज धोरण निश्चित केले. त्यामध्ये पूर्वी ७० वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही ‘लकी ड्रॉ’ला सामोरे न जाता यात्रेला जाता येत होते. या प्रवर्गात आता वयोमर्यादा ६५ वर्षे करण्यात आली. त्यांच्यासोबत कम्पेनियन म्हणून जाणाऱ्या नातेवाइकांचे वय आता १८ ते ६० पेक्षा जास्त नसावे, असे म्हटले आहे. त्यामुळे भाविकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

सौदी अरेबिया सरकाने यंदा भारतातून १ लाख ७५ हजार २५ हज यात्रेकरूंना पाठविण्याची मुभा दिली. हज कमिटीला ७० टक्के, तर खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल कंपन्यांना ३० टक्के कोटा निश्चित करण्यात आला. मागील वर्षी हा कोटा हज कमिटीला ८० टक्के, तर खासगी टूर्सला २० टक्के होता. महाराष्ट्रातून यंदा १० हजार भाविक हजला रवाना होतील. हज यात्रेच्या ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ हज पिलग्रीम सोशल वर्करचे महासचिव शेख फैसल यांनी दिली.

तीन शहरांतून यात्रेकरू होणार रवाना१५० हज यात्रेकरूंची सेवा करण्यासाठी शासनाकडून एक खिदमतगार म्हणून शासकीय कर्मचाऱ्याची नेमणूक केली जात होती. आता या खिदमतगारला स्टेट हज क्लेक्टर, असे संबोधले जाईल. महाराष्ट्रातून तीन ठिकाणांहून हज यात्रेकरू रवाना होतील. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन ठिकाणी सोय असेल. संभाजीनगरहून जाणाऱ्यांना एका प्रवाशामागे किमान ८० हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

६३ वर्षांची पत्नी असेल तर...केंद्राने नवीन हज धोरणात ज्येष्ठ नागरिकांना थेट यात्रेला जाण्यासाठी वयोमर्यादा घटविली. सोबतच त्यांच्या नातेवाइकाचे वयही घटविले. यात्रेकरूची बायको ६३ वर्षांची असेल, तर तिला सोबत नेता येणार नाही. मुलगा, सुनेला नेता येईल. १८ ते ६० या प्रवर्गात बायको न बसल्यास पंचाईत होईल, असे अनेक भाविकांचे म्हणणे असल्याचे फैसल शेख यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuslimमुस्लीम