शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स.भु. शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी दिनेश वकील, उपाध्यक्षपदी सुहास बर्दापूरकर

By राम शिनगारे | Updated: December 1, 2023 21:47 IST

विश्वस्तांमध्ये श्रीरंग देशपांडे यांना सर्वाधिक मते

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वांत जुनी शिक्षण संस्था श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत ॲड.दिनेश वकील यांनी अध्यक्षपदी विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी डॉ.नंदकुमार उकडगावकर यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदी डॉ.सुहास बर्दापूरकर यांनी बाजी मारत ओमप्रकाश राठी यांचा पराभव केला. सर्वसाधारण गटात डॉ.श्रीरंग देशपांडे यांनी सर्वाधिक ५७ पैकी ५२ मते घेत विजय मिळविला.

स.भु. शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक नियामक मंडळासाठी शुक्रवारी संस्थेच्या मुख्य कार्यालयात मतदान झाले. ६४ पैकी ५७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणी केली. अध्यक्षपदासाठी ॲड.दिनेश वकील यांना ५७ पैकी ३६ मते, तर डॉ.नंदकुमार उकडगावकर यांना २१ मते पडली. उपाध्यक्षपदासाठी डॉ.सुहास बर्दापूरकर यांना ३० मते, तर ओमप्रकाश राठी यांना २७ मते मिळाली. आश्रयदाता गटात प्राचार्य डॉ.उल्हास शिऊरकर यांना ३४ मते, तर प्रतिस्पर्धी डॉ.अजित भागवत यांना २३ मते मिळाली. हितचिंतक गटात प्रवीण मंडलिक यांनी २८ मते, तर प्रसाद कोकिळ यांनी २७ मते मिळविली. दोन मते बाद ठरली.

सर्वसाधारण गटात ११ जण विजयीसंस्थेच्या सर्वसाधारण गटात १६ उमेदवारांपैकी ११ जण विजयी झाले. त्यात डॉ.श्रीरंग देशपांडे यांना सर्वाधिक ५२ मते मिळाली. त्याशिवाय डॉ.रश्मी बोरीकर ४९, अमोल भाले ४०, रमेश जोशी ४०, डॉ.बाळकृष्ण क्षीरसागर ३८, डॉ.मिलिंद कोनार्डे ३७, प्रमोद माने ३६, डॉ.साधना शाह ३६, मिलिंद रानडे ३५, डॉ.योगेश इंगळे ३४ आणि डॉ.रामेश्वर तोतला यांनी ३४ मते घेत विजय संपादन केला, तर रामचंद्र मेढेकर २६, गौतम देशमुख २५, माधव उर्फ रमेश गुमास्ते २५, प्रा.सुहास पानसे २५ आणि विजय सांगवीकर यांना १२ मते पडली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद