शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-औरंगाबाद शिवशाही बसची डिझेल टाकी फुटली; सुदैवाने दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 23:10 IST

शिवशाही बसच्या अपघाताचे सत्र सुरुच

औरंगाबाद : शिवशाही बसच्या अपघाताचे सत्र सुरुच आहे. नागपूर-औरंगाबाद शिवशाही बसची डिझेल टाकी फु टल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास  सिडको बसस्थानकात घडली. एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाºयांनी वेळीच खबरदारी घेतल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.नागपूर-औरंगाबाद शिवशाही बस (एमएच-०९, ईएम-१९४१)औरंगाबादला येईपर्यंत जवळपास १५ प्रवासी होते. ही बस सिडको बसस्थाकात दाखल होताना प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावरील खड्डेमय परिस्थितीमुळे डिझेल टाकीला धक्का लागला. त्यातून डिझेल टाकी फुलटी आणि इंदनाची धारच लागली. इंधनाची गळती होत असल्याचा प्रकार लक्षात येताच आगार व्यवस्थापक पी. पी. देशमुख यांनी स्वत: खबरदारी घेत प्रयत्न केले.गळतीमुळे बसस्थानकात मोठ्या प्रमाणात डिझेल पसरले. त्यामुळे प्रवाशांमध्येही भिती पसरली. बसस्थानकातील अधिकारी-कर्मचाºयांची एकच धावपळ झाली. ही बस जागेवरच थांबवून प्रवाशांना उतरविण्यात आले. गळती होणारे डिझेल बसस्थानकात कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या डस्टबिनमध्ये गोळा करण्यात आले. तीन डस्टबिन इंधनाने भरून गेले.इंधनाच्या गळतीमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परंतु वेळीच घेण्यात आलेल्या खबरदारीमुळे कोणत्याही अपघाताला सामोरे जावे लागले नाही. या घटनेची एसटी कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये एकच चर्चा सुरु होती.

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी