शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खरंच, महावितरणने मान्सूनपूर्व कामे केली ? शहरात गल्लोगल्ली नागरिकांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:49 IST

चिकलठाण्यातील घटनेच्या पुनरावृत्तीचाच धोका; महावितरणच्या नावात ‘वितरण’ असले, तरी गेल्या काही वर्षांत या विजेच्या वितरणापेक्षा ‘मरण’ अधिकच वाट्याला येत असल्याचीही चिंताजनक परिस्थिती आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गल्लोगल्ली, रस्तोरस्ती झाडांच्या फांद्यांमधून गेलेल्या विद्युत तारा, अगदी हाताच्या अंतरावर लटकणाऱ्या विद्युत वाहिन्यांमुळे नागरिकांचा जीवच टांगणीला लागल्याची स्थिती आहे. ही परिस्थिती पाहता महावितरणने मान्सूनपूर्व कामे केली की कामाच्या नावाखाली हात धुऊन घेतले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या परिस्थितीमुळे शहरात कधीही चिकलठाण्यातील घटनेची पुनरावृत्तीचा धोका नाकारता येत नाही.

महावितरणच्या नावात ‘वितरण’ असले, तरी गेल्या काही वर्षांत या विजेच्या वितरणापेक्षा ‘मरण’ अधिकच वाट्याला येत असल्याचीही चिंताजनक परिस्थिती आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, नागरिकांचे प्राण वाचवणे ही जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे, तीच आता नागरिकांच्या जिवाशी खेळ करताना दिसतेय. मान्सूनपूर्व तयारीचा डंका वाजवला जात असतानाही शहरातील किती तरी भागांत झुकलेले खांब झुकलेले, लोंबकळणाऱ्या तारा, झाडांमधून गेलेल्या विद्युत तारा, काही ठिकाणी उघड्या डीपी; अशी धोकादायक अवस्था आहे.

किती खर्च, हे गुलदस्त्यातचमान्सूनपूर्व किती खर्च झाला, हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनाच माहीत नाही. एका अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कामांवर खरेच खर्च करण्यात आला का, असा प्रश्न पडत आहे. परिमंडळात विजेचा झटका लागून अपघात घडलेले असूनही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ढिलाई संपत नाही.

विद्युत अपघातात ४५ मृत्यू२०२४-२५ या वर्षात महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात विद्युत अपघातात ४२ व्यक्ती व एक बाह्यस्रोत कंत्राटी कामगार, अशा ४३ जणांचा मृत्यू झाला, तर दोन दिवसांपूर्वी चिकलठाण्यात दोघांचा मृत्यू झाला. तसेच विद्युत अपघातात १६ व्यक्ती जखमी झाले.

सतत चालणारे काममान्सूनपूर्व कामे करण्यात आली आहेत. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पाऊस पडला की पुन्हा झाडे वाढतात. तेव्हा पुन्हा झाडांच्या फांद्या कापल्या जातात. मान्सूनपूर्व कामांवर किती खर्च झाला, याची माहिती काढली जाईल.- मनीष ठाकरे, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :Accidentअपघातmahavitaranमहावितरण