शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा एक कॉल थांबवू शकतो बालविवाह; चाइल्ड लाइनसाठी डायल करा टोलफ्री क्रमांक १०९८

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 15, 2024 18:56 IST

जो कॉल करून माहिती देतो त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच या नंबरवर कॉल केला तर त्याचे पैसे लागत नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात बालविवाहांची संख्या मोठी आहे. पण, आता बालविवाह रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेला गावकरी साथ देत असल्याने हे प्रकार उजेडात येऊ लागले आहेत. तुमच्या गावात, घर परिसरात कुठे बालविवाह होत असले तर थेट टोल फ्री नंबर १०९८ वर कॉल करा, सरकारी यंत्रणा तिथे येऊन तो बालविवाह रोखतील.

जिल्ह्यात ४१ बालविवाह रोखलेतालुका रोखलेले बालविवाह संख्या१) छ. संभाजीनगर १४२) पैठण १२३) गंगापूर ६४) वैजापूर ३५) खुलताबाद ३६) कन्नड १७) फुलंब्री १८) सिल्लोड १९) सोयगाव ०

किती वर्षाच्या आत लग्न कायद्याने गुन्हा ठरू शकतो१) मुलीचे वय १८ वर्षांच्या आत व मुलाचे वय २१ वर्षांच्या आत असेल तर त्यांचा बालविवाह समजण्यात येतो.२) बालविवाह अधिनियम २००६ नियम २२ अन्वये बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.३) २ वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद, एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा.

कोणावर दाखल होऊ शकतो गुन्हाबालविवाह होत असताना हजर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. बालविवाह लावणाऱ्या गुरुजींपासून ते आई-वडील वऱ्हाडी, बँड, डिजेवाल्यांपर्यंत सर्वांवर गुन्हे दाखल होऊ शकतात.

चाइल्ड लाइनचा नंबर १०९८ कॉल कराबालविवाह होत असल्यास तुम्ही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर किंवा चाइल्ड लाइनला १०९८ यानंबरवर कॉल करा. जो कॉल करून माहिती देतो त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच या नंबरवर कॉल केला तर त्याचे पैसे लागत नाहीत. तो नंबर विनाशुल्क आहे.

बालविवाह रोखण्याची कोणावर जबाबदारी ?१) ग्रामपंचायत क्षेत्र : ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह होत असले तर त्यास रोखण्याची जबाबदारी सर्व गावकऱ्यांवर आहे. मात्र, शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे. अंगणवाडी सेविकांना सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.२) शहरी भाग : शासनाच्या आदेशानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहे.

जागरूक रहा, फोन करून कळवाबालविवाह होताना तुम्ही बघ्याची भूमिका घेऊ नका, नाही तर वऱ्हाडी म्हणून तुमच्यावरही गुन्हा दाखल होईल. शहरवासी असो की गावकरी सर्वांनी ‘सावधान’ राहण्याची आवश्यकता आहे. सजग राहा, लहान मुलींचे लग्न लावण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही एक फोन करुन शासनाला माहिती कळवा. तुमचा एक फोन त्या लहान मुलीचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचू शकते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद