यात लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष व जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. इन्कलाब जिंदाबाद, जाचक कृषी कायदे रद्द करा, अशा घोषणांनी पैठण गेट परिसर दणाणून गेला होता.
प्रारंभी आयटक नेते कॉ. राम बाहेती यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर अनेकांनी मनोगते व्यक्त करत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध नोंदविला.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. मनोहर टाकसाळ, सिटूचे कॉ. मंगल ठोंबरे, लक्ष्मण साक्रुडकर, दामोदर मानकापे, श्रीकांत फोपसे, बसवराज पटणे, संतोष औताडे, गंगाधर शेवाळे, भाकपचे मधुकर खिल्लारे, भास्कर लहाने, अभय टाकसाळ, आम आदमी पार्टीचे ॲड. सुभाष माने, इसाक अंडेवाला, अशीर जयहिंद, गौरव भार्गव, वैजनाथ राठोड, अजबराव मानकर, दत्तू पवार, कॉ. रंजन दाणी, इंटकचे ॲड. इक्बालसिंग गिल, ॲड. सुभाष देवकर आदींसह कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.