शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

धर्मापुरी... एक गाव फक्त कागदावरचं !

By admin | Updated: March 28, 2015 00:45 IST

रमेश कोतवाल , देवणी देवणी व उदगीर तालुक्यांच्या सीमेवर अन् निसर्गरम्य हत्तीबेटाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव़़़

रमेश कोतवाल , देवणीदेवणी व उदगीर तालुक्यांच्या सीमेवर अन् निसर्गरम्य हत्तीबेटाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव़़़ धर्मापुरी़ महसूल दफ्तरी या गावाची नोंद देवणी तालुक्यात़ या नोंदीनुसार आजही या ठिकाणी गाव नांदतेय़् परंतु, प्रत्यक्षात मात्र याठिकाणी उभे आहेत, भग्नावशेष़ येथे रहायला कोणीच नाहीत़ परंतु, सरकारी नोंदीमुळे प्रत्येक उपक्रमाच्या वेळी यंत्रणेची हकनाक धावपळ होते़ धर्मापुरी या अजब गावाची गजब कहाणी अशी की, हे गाव महसुली दर्जा प्राप्त आहे़ गुरधाळ-पेठेवाडीजवळ हत्तीबेटाच्या पायथ्याशी या गावाचे अस्तित्व़ या गावाचे भौगोलिक क्षेत्र १२६ हेक्टर्स इतके सर्व्हे क्रमांक १९ मध्ये विभागून होते़ या नोंदी आजही तशाच शाबित आहेत़ येथील जमिनी १९५३-५४ च्या खासरा पाणी नोंदीनुसार महादा फावडे, धोंडिबा पाटील, पांडुरंग गुरव, महंमद कासार, रामबुवा काशीनाथ बुवा, तुकाराम बंडगर, केशवराव कुलकर्णी, गंडा बंडगर, गोपाळ पेठे, संभाजी पेठे, नामदेव पेठे, नरसिंग बंडगरे, पांडुरंग बिरादार, गोविंद कुलकर्णी यांच्या नावे आहेत़ दरम्यानच्या काळात हळुहळु हे गाव शेजारच्या गावांमध्ये मिसळून गेले़ येथील नागरिक टप्प्या-टप्प्याने गावाजवळील सय्यदपूर, महमदापूर, चवणहिप्परगा व पेठेवाडी या गावांमध्ये स्थायिक झाले़ येथील जमिनीही कालांतराने शेजारच्या गावांतील नागरिकांच्या नावे हस्तांतरित झाल्याचे महसूल विभाग सांगतो़ त्यामुळे हे गाव गेल्या कित्येक वर्षांपासून ओस पडलेले आहे़ येथील जुने भग्नावशेष सध्या वस्तीची साक्ष देत उभे आहेत़ धर्मापुरीच्या नोंदी प्रशासनासाठी मात्र दमछाक करणाऱ्या ठरत आहेत़ कोणत्याही शासकीय उपक्रमानिमित्त बऱ्याचदा यंत्रणा या गावाकडे चक्कर टाकतात़ परंतु, येथे कोणीच वास्तव्यास नसल्याने त्यांचा फुकटचा हेलपाटा पडत आहेत़ मागच्याच जनगणनेच्या वेळीही प्रगणक या गावी पाठविण्यात आला होता़ अलिकडच्या कालावधीत आधार कार्डचा कॅम्प या गावात लावण्यात आला होता़ त्यानुसार सगळी यंत्रणा तिथे गेली़ मतदार नोंदणी किंवा अन्य सर्व्हेच्या वेळीही शासकीय यंत्रणांना असाच अनुभव येत असल्याने धर्मापुरी म्हणजे प्रशासनासाठी भुलभुलैय्याच ठरले आहे़धर्मापुरी-सय्यदपूर ग्रुप ग्रामपंचायतीला जोडलेली आहे. तर गुरधाळ तलाठी सज्जाअंतर्गत अजूनही कागदोपत्री गाव जोडलेले आहे. ४विविध उपक्रमाची माहिती देण्यासाठी सरकारी नोंदीमुळे कर्मचाऱ्यांची नाहक धावपळ.४कित्येक वर्षांपासून ओस पडलेले गाव महसूल दप्तराच्या नोंदीमुळे चर्चेत.